शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पत्नीचे दिरासोबत विवाहबाह्य संबंध, जामिनावर सुटल्यावर पतीने काढला भावाचा काटा 

By पूनम अपराज | Published: October 31, 2020 8:33 PM

Murder : 2 महिन्यांपूर्वी 28 ऑगस्ट रोजी चांदौली कोतवालीच्या धुरी कोट गावात राकेश रोशन नावाच्या युवकाचा मृतदेह सापडला होता. ज्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते. 

ठळक मुद्देआशुतोष यादव यांनी पोलिसांना सांगितले की, 2 महिन्यांपूर्वी झालेल्या राकेश रोशनच्या हत्येमध्ये तो सामील होता आणि राकेश रोशनचा खून त्याचा लहान भाऊ मुकेश यादव याने केला होता.

उत्तर प्रदेशातील चांदौली येथे पोलिसांनी 2 महिन्यांपूर्वी एका युवकाच्या खळबळजनक हत्येचे गूढ उकलले आहे. या प्रकरणात पोलिसांनी हत्येच्या मुख्य आरोपीला अटक केली आहे, तर या हत्येतील आरोपींपैकी एक आरोपी आधीच पोलिसांच्या ताब्यात आहे, ज्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा उघडकीस आला आहे. 2 महिन्यांपूर्वी 28 ऑगस्ट रोजी चांदौली कोतवालीच्या धुरी कोट गावात राकेश रोशन नावाच्या युवकाचा मृतदेह सापडला होता. ज्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते. परंतु या हत्येमागे कोण आहे याचा पोलिसांना निष्कर्ष काढता आला नाही. दरम्यान, 29 ऑक्टोबरला पोलिसांनी गोळीबारावेळी आशुतोष यादव नावाच्या गुन्हेगाराला अटक केली.पोलिस चौकशीत आशुतोष यादवने आपल्या  कृत्याची कबुली दिल्याने आश्चर्यचकित झाले. आशुतोष यादव यांनी पोलिसांना सांगितले की, 2 महिन्यांपूर्वी झालेल्या राकेश रोशनच्या हत्येमध्ये तो सामील होता आणि राकेश रोशनचा खून त्याचा लहान भाऊ मुकेश यादव याने केला होता. आशुतोष यादव यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या हत्येमागील कारण जाणून घेत मुकेश यादव याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसही आश्चर्यचकित झाले.

मुकेश यादवने आपल्या मोठ्या भावाची हत्या केली. कारण त्यांच्या मोठ्या भावाचे पत्नीशी अवैध संबंध होते. मुकेश यादव 3 वर्षांपूर्वी झालेल्या खून प्रकरणात तुरूंगात होता. यावेळी त्याचा मोठा भाऊ राकेश रोशन याचा पत्नीशी संबंध आला. काही महिन्यांपूर्वी मुकेश यादव जामिनावर सुटल्यानंतर घरी आला. तेव्हा त्याला कळले की, त्याच्या पत्नीचे त्याच्या मोठ्या भावाशी विवाहबाह्य संबंध आहेत. दुसरीकडे, आशुतोष यादवही काही प्रकरणात तुरूंगात होता आणि त्याने मुकेश यादवशी मैत्री केली होती. 

आशुतोष यादव जामिनावर तुरूंगातून बाहेर आला, तेव्हा मुकेश यादवने आशुतोष यादवला संपूर्ण कहाणी सांगितली. यानंतर मुकेश यादव याने आशुतोष यादवच्या मदतीने आपल्या मोठ्या भावाच्या हत्येचा कट रचला. मुकेश यादव याने आशुतोष यादव व दुसरा मित्र रामानंद याच्यासह आपला मोठा भाऊ राकेश रोशनला दारू पिण्याच्या बहाण्याने गावाबाहेर सीवान येथे नेले आणि गोळ्या घातल्या.

२८ ऑगस्ट रोजी झालेल्या या हत्याकांडाचा पोलिसांना काही माहिती कळू शकली नाही, परंतु २ दिवसांपूर्वी  २८/२९ ऑक्टोबरदरम्यान रात्री पोलिसांनी आशुतोष यादव याला पकडले असता हत्येचे गूढ उकलले. या प्रकरणात पोलिसांनी राकेश रोशन हत्येत सहभागी असलेल्या त्याचा धाकटा भाऊ मुकेश यादव याला अटक केली आणि तुरुंगात पाठविले. तर या खून प्रकरणातील आणखी एक आरोपी रामानंद अजूनही फरार आहे. 

टॅग्स :MurderखूनjailतुरुंगFiringगोळीबारPoliceपोलिस