मुंबई - मुंबईच्या वडाळा येथे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या प्रेमसंबंधावर संशय घेतला. पतीने पत्नीच्या भावाला व्हिडिओ कॉल केला आणि समोरच पत्नीला मारहाण करण्यास सुरवात केली. त्या भावाने समजावून सांगितले तरीही त्याने ऐकले नाही, त्याने पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून आरोपी पतीला ताब्यात घेतले.
मुंबई पोलिसांप्रमाणे 'या' ज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांना घरी राहण्याच्या सूचना द्या
पोलिसांनी सांगितले की, निलेश मूळचा उत्तर प्रदेशातील आजमगडचा रहिवासी आहे. तो येथे पत्नी लक्ष्मी, आठ वर्षांचा मुलगा आणि त्याच्या पालकांसह मुंबईतील वडाळाच्या सद्भावना नगर येथे राहतो. तो विविध कॅब अॅग्रिगेटरसह ड्रायव्हर म्हणून काम करतो. लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी निलेशचे पालक आझमगड येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरात गेले.
संशयास्पद! तरुण अभियंत्याचा संशयास्पद मृत्यू, कोरोना रिपोर्ट आला निगेटिव्ह
मध्यरात्री मित्राशी चॅटशुक्रवारी मध्यरात्री त्यांची पत्नी मित्राशी चॅट करत होती, असे पोलिसांनी सांगितले. निलेशने विचारले असता ती आपल्या मैत्रिणी आशाबरोबर गप्पा मारत असल्याचे सांगते. जेव्हा लक्ष्मीचा मोबाईल पाहिला तेव्हा ती दुसर्याशीच बोलत होती, असा निलेशचा आरोप आहे. यावरून दोघांमध्ये भांडण झाले.पोलिसांनी मारहाण करताना पकडले पतीला असा आरोप आहे की, निलेशने लक्ष्मीला झाडूने मारहाण केली. त्याने लक्ष्मीच्या भावाला व्हिडिओ कॉल केला आणि लक्ष्मीला त्याच्या समोर मारहाण करण्यास सुरवात केली. लक्ष्मीच्या भावाने पोलिसांना पाचारण केले, त्यानंतर वडाळा पोलिसांची टीम त्याच्या निवासस्थानी पोहोचली आणि लक्ष्मी व तिच्या मुलाची सुटका केली. पोलिसांनी निलेशविरोधात विविध कलमांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, निलेशला कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. लॉकडाऊनदरम्यान देशभरात घरगुती हिंसाचार वाढल्याचे त्याने सांगितले. त्यांच्याकडे असे अधिक प्रकार घडत आहेत.