दिल्लीमध्ये एका व्यक्तीच्या घराच्या बाहेरून त्याची फॉर्च्युनर कार चोरी झाली. त्याच्या तक्रारीवरून विवेक विहार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र, इन्शुरन्स कंपनीने त्याचा २३ लाखांचा क्लेम देण्यास नकार दिला. कारण असे की त्याच्याकडे कारची दुसरी चावी नव्हती. (Consumer court order HDFC to give Car theft claim after key loss.)
महिला पोलीस अधिकारी अंघोळ करत होती; ड्रायव्हर व्हिडीओ काढून फरार
कंपनीचे म्हणणे होते की त्याने कारची दुसरी चावी परत केलेली नाही. यामुळे नियमानुसार आम्ही क्लेम देणार नाही. कार मालकाने दुसरी चावी हरवल्याचे सांगितले. घरात शोधली परंतू ती सापडली नसल्याचे म्हटले आहे. तरीही कंपनीने क्लेम दिला नाही. या कार मालकाने दिल्लीच्या ग्राहक न्यायालयात धाव घेतली. त्यावर तेथील न्यायाधीश ओपी गुप्ता यांनी यावर निर्णय दिला आहे. इन्शुरन्स कंपनीने त्या कार मालकाला सहा टकक्यांच्या व्याजासह क्लेमची ७५ टक्के रक्कम द्यावी. यावर कंपनीने ती रक्कम कार मालकाला दिली आहे.
कारमालक संदीप तनेजा हे सूरजमल विहार भागात राहतात. १७ फेब्रुवारी २०१४ च्या रात्री ८वाजण्याच्या सुमारास त्यांची कार घराच्या बाहेरून चोरी झाली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यांचा एचडीएफसी अर्गो जनरल इंशुरन्स कंपनीचा कार विमा होता. जुलै २०१४ पर्यंत इन्शुरन्स असल्याने त्यांनी कंपनीकडे क्लेम मागितला. तसेच कंपनीला एक चावी दिली. कंपनीने दुसरी चावी मागितली तेव्हा त्यांनी दुसरी चावी घरात कुठेतरी गहाळ झाल्याचे सांगितले.
कंपनीने याच गोष्टीचा पॉलिसी मुद्दा बनवून क्लेम देण्यास नकार दिला. यानंतर कार मालकाने वकील राजेश शर्मा यांच्याद्वारे दिल्लीच्या ग्राहक न्यायालयात धाव घेतली. तसेच १८ टक्के व्याजदराने क्लेमची रक्कम देण्यासह मानसिक त्रासापोटी २ लाख रुपये आणि २१ हजार रुपये न्यायालयीन खर्च देण्याची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि सहा टक्क्याने क्लेमची ७५ टक्के रक्कम देण्याचा आदेश दिला.