शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

बायकोच्या मदतीनं प्रेयसीचं छाटलं मुंडकं, थरकाप उडवणारी अनैतिक 'लव्ह स्टोरी'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2022 2:29 PM

Murder Case : सुहागिनी रामवीर सिंह असं हत्या झालेल्या 21 वर्षीय तरुणीचं नाव आहे. 

लखनऊ - एका विवाहित तरुणाने आपल्या पत्नीच्या मदतीने प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुणानं आपली पत्नी आणि मित्राच्या मदतीनं आधी प्रेयसीचा गळा आवळला. नंतर शिर धडावेगळं करत मृतदेह यमुना नदीत फेकून दिला. या प्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांनी पोलिसांत मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर ही हत्येची थरारक घटना समोर आली आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. सुहागिनी रामवीर सिंह असं हत्या झालेल्या 21 वर्षीय तरुणीचं नाव आहे. 

सुहागिनी उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्याच्या वैदपुरा परिसरातील खरदूली गावातील रहिवासी होती. या प्रकरणी पोलिसांनी मोहन, त्याची पत्नी आणि मित्र यांना अटक केली आहे. आरोपी मोहन हा जेसीबी चालक असून तो विवाहित आहे. २०१९ साली त्याचं लग्न झालं होतं. लग्नानंतर काही दिवसांनी तो वैदपुरा परिसरातील खरदूली गावात कामानिमित्त जायचा. त्यामुळे अनेकदा कामाच्या ठिकाणीच तो मुक्काम करत असे. दरम्यान त्याची ओळख २१ वर्षीय तरुणी सुहागिनीशी झाली. यानंतर दोघांत प्रेमसंबंध जुळले. दोघांचे प्रेमप्रकरण काही दिवस सुरु होते. नंतर सुहागिनीने मोहनकडे लग्नासाठी तगादा लावला. तसेच लग्न न केल्यास पोलिसांत तक्रार करेल अशी धमकी सुहागिनीनं दिली. यामुळे आरोपी मोहन काळजीत पडला होता. यानंतर त्याने आपलं लफडं पत्नीला सांगितला आणि सुहागिनीच्या हत्येचा कट रचला.

७ फेब्रुवारी रोजी मोहननं सुहागिनीला फूस लावून बादपुरा भागातील यमुना नदीवरील रेल्वे पुलावर घेऊन गेला. तिथे आधीपासून मोहनची पत्नी आणि त्याचा मित्र राहुल उपस्थित होते. या सर्वांनी मिळून सुहागिनीची स्कार्फने गळा आवळून हत्या केली. यानंतर तिघांनीही चाकूनं तिचा गळा कापून शिर धडावेगळं केलं. नंतर आरोपीने मृत तरुणीचे शिर आणि धड यमुना नदीत टाकून घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करत हत्येचं गूढ उलगडलं आहे. आरोपींना अटक केली असून तिन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक