राजस्थानच्या जालोर पोलिसांनी चोरीचा माल घेऊन पळून गेलेल्या नववधूसह एका महिला दलालास अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, भीनमालच्या माघ कॉलनीत राहणारा अभिषेक उर्फ धरमचंद जैन याने कलेल्या तक्रारीत त्याने सीता गुप्ता नावाच्या महिलेशी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे लग्न केल्याची माहिती दिली. स्वरूपगंजमध्ये राहणाऱ्या मनीषा सेनच्या मध्यस्तीतून हा विवाह झाला होता. लग्नापूर्वी मनीषाने सांगितले होते की, सीता ही एक साधी घरगुती मुलगी आहे आणि ती एका चांगल्या मुलाच्या शोधात आहे.यानंतर अभिषेक आणि सीता यांची भेट होऊ लागली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. त्यानंतर 03 जानेवारी 2022 रोजी दोघांनी लग्न केले. मात्र 21 जानेवारी रोजी घरातील कपाटात ठेवलेले 1 लाख 45 हजार रुपये आणि 5 तोळे सोन्याचे दागिने घेऊन सीता फरार झाली. सासरच्यांनी वधूचा शोध घेतला मात्र ती कुठेच सापडली नाही. यानंतर घरातील वॉर्डरोब तपासण्यात आला. ज्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम गायब होती. त्यानंतर लगेचच पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.
गायीजवळ लघुशंका केल्यानं वृद्धास मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यांनतर पोलिसांची कारवाईघरातून रोख रक्कम आणि दागिने घेऊन वधू फरारवधूला पकडण्यासाठी पोलीस अधिकारी लक्ष्मण सिंह चंपावत यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले. फोन सर्विलंसच्या मदतीने महिला दलाल मनीषा सेन हिला प्रथम अटक करण्यात आली आणि तिची कसून चौकशी करण्यात आली. ज्यात तिने आपला गुन्हा कबूल केला. यानंतर पोलिसांनी चोरीचा माल घेऊन पळून गेलेल्या नववधूला पकडण्यासाठी सापळा रचून तिलाही लवकरच अटक केली.पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केलीत्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. वधू उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगितले जात आहे. ति च्याकडून सापडलेल्या सोन्याचे दागिने तपासण्यात येत आहेत. आता या महिलेने अशा किती घटना घडवल्या याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.