Crime News : बरेलीच्या एडीजीसी कोर्टाने 1 वर्षाच्या आत हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायाधीश तबरेज अहमद खान यांच्या कोर्टाने ज्योती आणि तिचा प्रियकर अब्बास याला जन्मठेपेची शिक्षा आणि 40 हजार रूपये दंड ठोठावला आहे. या घटनेत 7 वर्षाच्या मुलीच्या जबाबाला कोर्टाने पुरावा मानत हा निर्णय दिला.
बरेलीच्या वैष्णो धाम कॉलनीमध्ये संजयच्या हत्येसाठी त्याची पत्नी ज्योती आणि तिचा प्रियकर अब्बास याला जन्मठेप आणि 40 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. दोघांच्या प्रेम संबंधात पती आडकाठी ठरत होता. ज्यामुळे ही हत्या करण्यात आली. 7 वर्षाची मुलगी निशीने ही हत्या डोळ्यांनी पाहिली होती.
आधी जेवणातून नशेची गोळी तिची आई ज्योतीने टाकली होती. ज्यानंतर पती बेशुद्ध झाला आणि मग ज्योती आणि तिच्या प्रियकराने ओढणीने गळा आवळून संजयची हत्या केली. संजयची मुलगी निशीने तिच्या मोठ्या वडिलांनी सगळी घटना सांगितली. तसेच संजयच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमांच्या खूणाही आढळल्या.
पोलिसांनी या हत्याकांडाचा खुलासा करत ज्योती आणि तिच्या प्रियकरावर हत्येचा आरोप करत तुरूंगात पाठवलं. 7 वर्षाच्या मुलीनेच वडिलांसोबत काय केलं याचा खुलासा केला. संजयच्या कुटुंबियांनी दोघांनाही फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. आता मुलीचा सांभाळ संजयचा मोठा भाऊ करत आहे.
मृत पत्नी संजय आपल्या पत्नी आणि मुलांसोबत वैष्णोधाम कॉलनी भाड्याच्या घरात राहत होता. तो गाडी चालवत होता. पती बाहेर गेल्यावर ज्योती प्रियकर अब्बासला घरी बोलवत होती. मुलगी निशीने आईला अब्बाससोबत पाहिलं होतं. तिने ते वडिलांना सांगितलं.
संजयने या गोष्टीसाठी पत्नीला विरोध केला. त्यानंतर तो ज्योती आणि अब्बासच्या संबंधात आडकाठी ठरत होता. त्यामुळे त्यांनी संजयची हत्या करण्याचा प्लान केला. 2 जून 2022 ला ज्योतीने संजयला जेवणातून नशेची गोळी दिली. नंतर प्रियकर अब्बासला फोन करून बोलवलं. दोघांनी मिळून संजयचा गळा दाबून त्याची हत्या केली. मुलगी निशीने आईला हे सगळं करताना खिडकीतून पाहिलं होतं. संजयची हत्या केल्यावर ज्योती आणि अब्बास तिथून पळून गेले. पण मुलीच्या जबाबामुळे आईला जन्मठेपेची शिक्षा झाली.