नवी दिल्ली - चीनसाठी हेरगिरी करणाऱ्यांचा संबंध पत्रकारांशी येत आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एका फ्रिलान्सर पत्रकारासअटक केली आहे. पत्रकार राजीव शर्मा यांच्यावर तो चीनसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप आहे. पत्रकाराशिवाय पोलिसांनी एक महिला आणि एका पुरुषास अटक केली आहे. यापैकी एक महिला चीनची असून दुसरा पुरुष नेपाळचा आहे.पत्रकार राजीव शर्मा यांना पितामपुरा येथील त्यांच्या घरातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी राजीव कडून चीनविषयी काही गुप्त कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय त्याच्याकडून संरक्षण संबंधित कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत. त्यांना अधिकृत गोपनीयता कायद्यांतर्गत (ऑफिशियल सीक्रेसी एक्ट) अटक करण्यात आली आहे. सध्या कोर्टाने त्यांना ६ दिवसांच्या कोठडी सुनावली आहे. राजीव शर्माने द ट्रिब्यून आणि यूएनआय मध्ये काम केले आहे.
अटक करण्यात आलेल्या राजीव शर्माला गेल्या एका वर्षात ४०-४५ लाख रुपये मिळाले. शर्मा यांना प्रत्येक माहितीसाठी १००० डॉलर्स घेतले. राजीव शर्माला पत्रकारितेचा जवळजवळ ४० वर्षांचा अनुभव आहे. तो चिनी सरकारी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाईम्स’ मध्ये तसेच भारतातील बर्याच माध्यम संस्थांसह संरक्षण विषयावर लिहित होतो, असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं. राजीव २०१६ मध्ये चिनी एजंटच्या संपर्कात आला होता. फ्रिलान्स पत्रकार राजीव शर्माला १४ सप्टेंबरला केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या माहितीच्या आधारावर अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून संरक्षण मंत्रालयाची गोपनीय कागदपत्रंही मिळाली होती.
अन्य महत्वाच्या बातम्या...
बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा
युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच
Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा
करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार