पत्नीने पती नपुंसक असल्याचं सासूकडे सांगितलं आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 02:45 PM2022-07-20T14:45:57+5:302022-07-20T14:46:18+5:30
पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीत पोलिसांना सांगितलं की, तिचं लग्न 2019 सालात झालं होतं. सासरच्या लोकांनी हे लपवलं होतं की, त्यांच्या मुलात काहीतरी समस्या आहे.
इंदुरमध्ये एका महिलेने तिच्या पतीवर शारीरिक आणि मानसिक रूपाने कमजोर असल्याचा गंभीर आरोप केला आहे. सोबतच पोलिसात सासरच्या लोकांविरोधात त्रास देण्याबाबत आणि हुंड्याची मागणी करण्याबाबत तक्रार दाखल केली आहे. महिलेने सासरच्या लोकांवर आरोप केला आहे की, लग्नावेळी सासरच्या लोकांनी याबाबत काहीच उल्लेख केला नव्हता.
पीडितेने दाखल केलेल्या तक्रारीत पोलिसांना सांगितलं की, तिचं लग्न 2019 सालात झालं होतं. सासरच्या लोकांनी हे लपवलं होतं की, त्यांच्या मुलात काहीतरी समस्या आहे. जेव्हा तिने याबाबत आपल्या सासूकडे तक्रार केली तेव्हा तिने थातूर मातूर कारण देत विषय टाळला होता. त्यानंतर सासू आणि सासऱ्यांनी आपल्या घरून 20 लाख रूपये आणण्याचा दबाव टाकला.
महिलेने सांगितलं की, तिने वैतागून आपलं सासर सोडलं. त्यानंतरही सासू-सासऱ्यांनी त्रास देणं सोडलं नाही. त्यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी एसआय रामनरेश सिंह धदोरिया यांनी सांगितलं की, महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली आहे की, तिचा पती नपुंसक आहे. जेव्हा तिने हे तिच्या सासूला सांगितलं तेव्हा तिला त्रास देण्यात आला. चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल.