धक्कादायक घटना! सेल्फीचा नाद जीवावर बेतला; ८०० फूट दरीत पडून महिलेचा मृत्यू

By प्रविण मरगळे | Published: November 7, 2020 10:52 AM2020-11-07T10:52:44+5:302020-11-07T10:53:44+5:30

Woman dies when taking selfie News: सहा तासांच्या अथक प्रयत्नाने दरीतून महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. महू मंडलेश्वार घाट मार्गात ही घटना घडली

Woman dies after falling into valley while taking selfie in Madhya Pradesh | धक्कादायक घटना! सेल्फीचा नाद जीवावर बेतला; ८०० फूट दरीत पडून महिलेचा मृत्यू

धक्कादायक घटना! सेल्फीचा नाद जीवावर बेतला; ८०० फूट दरीत पडून महिलेचा मृत्यू

googlenewsNext

इंदूर – सेल्फी घेण्याच्या नादात एका महिलेला स्वत:चा जीव गमावावा लागला आहे, ही दुर्देवी घटना मध्य प्रदेशात घडली. अनेकदा सेल्फीमुळे जीव गेल्याच्या बातम्या वाचायला मिळतात, परंतु निष्काळजीपणामुळे अशा घटना थांबत नाहीत, मध्य प्रदेशात खरगोन जिल्ह्यातील कुटुंब जाम घाट येथे पर्यटनासाठी गेलं होतं, त्यावेळी सेल्फी घेताना महिलेचा तोल गेला अन् ती ८०० फूट दरीत पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

सहा तासांच्या अथक प्रयत्नाने दरीतून महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. महू मंडलेश्वार घाट मार्गात ही घटना घडली, करवा चौथनंतर इंदूरमध्ये राहणारे विकास बाहेती हे पत्नी नीतू आणि मुलीसह खरगोनच्या जाम घाट फिरण्यासाठी आले होते. यावेळी पती अन् मुलीसह सेल्फी घेणाऱ्या नीतू यांचा पाय कठड्यावरून घसरल्याने त्या ८०० फूट दरीत खाली पडल्या. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ मंडलेश्वर पोलीस टीम घटनास्थळी पोहचली. महिलेचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न सुरू केला, त्यानंतर ६ तासांनी या महिलेचा मृतहेद घनदाट जंगलात सापडला. त्यानंतर महिलेचा मृतदेह वर आणण्यात आला. जाम घाट फिरून येत असताना घाट मार्गात हे कुटुंब थांबलं होतं, एकाठिकाणी नीतू सेल्फी घेण्याच्या नादात तिचा पाय घसरला, त्यानंतर ती दरीत कोसळून जागीच मृत्यू झाला.

नीतू दरीत कोसळल्याने पती विकासला धक्का बसला, नीतूचा आवाज ऐकून घटनास्थळी लोकांची गर्दी झाली. मंडलेश्वर ठाण्याचे पोलीस अधिकारी संतोष सिसोदिया म्हणाले की, प्रथमदर्शनी हा अपघात वाटत आहे, सेल्फीच्या वेळी महिलेचा पाय घसरला आणि ती दरीत कोसळली, सध्या पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहे. महिलेचा मृतदेह पोस्टमोर्टम करण्यासाठी पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

Read in English

Web Title: Woman dies after falling into valley while taking selfie in Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.