मुंबई - रिक्षाच्या अपघातात ठाण्यात राहणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला. दहिसरमध्ये हा प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे.माणिक ठोकल (६०) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. शालिनी थॉमस (५४) या रिक्षाने त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी दहिसर परिसरात आल्या होत्या. त्यादेखील ठाण्यातच राहत असून मुलीला भेटल्यावर रिक्षाने त्या परतीच्या मार्गावर असताना हा अपघात घडला. ठोकल याने भरधाव वेगाने रिक्षा ठाणेच्या दिशेने नेली. मात्र घोडबंदर रस्त्यावर त्याचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे रिक्षा विजेच्या खांबाला धडकली. त्यात थॉमस आणि ठोकल हे जखमी झाले. मात्र थॉमस यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र थॉमस यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात दहिसर पोलिसांच्या हद्दीत झाला. त्यामुळे ठोकलवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला लवकरच अटक करण्यात येणार आहे.
दहिसरमध्ये रिक्षा अपघातात महिलेचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 13:41 IST
थॉमस आणि ठोकल हे जखमी झाले.
दहिसरमध्ये रिक्षा अपघातात महिलेचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल
ठळक मुद्देहा अपघात दहिसर पोलिसांच्या हद्दीत झाला.रिक्षा विजेच्या खांबाला धडकली.थॉमस यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.