आई ही आईच असते. आई आपल्या मुलांसाठी काहीही करु शकते. आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. प्रत्येक संकटात आई आपल्या मुलांच्या पाठिमागे पहाडासारखी उभी असते. प्रत्येक संकटाला ती तोंड देत असते. आपली मुलं संकटात सापडली तर आईलाही दु:ख होत असते. अशीच एक घटना समोर आली आहे. केरळमधील इडुक्की जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने मोठ्या मुलासह आत्महत्या केली. घराच्या आवारात असलेल्या विहिरीत या दोघांचा मृतदेह आढळला आहे. आपल्या लहान मुलाच्या मृत्यूच्या दु:खातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली असून काही दिवसापूर्वी महिलेच्या नवजात मुलाचा मृत्यू झाला होता. प्रत्यक्षात ही महिला नवजात मुलाला दूध पाजत होती. यादरम्यान घशात दूध अडकल्याने त्या बाळाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ही महिला शॉकमध्ये होती. याच दु:खात महिलेने हे जीवघेणे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
Agniveer : अग्निवीरांसाठी खुशखबर! BSF-CISF मध्ये मिळणार १० टक्के आरक्षण, वय, फिजिकल टेस्टमध्येही सूट
काल गुरुवारी घराशेजारी असणाऱ्या विहिरीत एक मुलगा आणि महिलेचा मृतदेह सापडला. मृतांमध्ये ३८ वर्षीय लिसा आणि तिचा सात वर्षांचा मुलगा बेन टॉम, दोघेही कैथपथल येथील रहिवासी आहेत. सकाळी सहाच्या सुमारास महिलेने मुलासह विहिरीत उडी घेतल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
घरातील बाकीचे सदस्य सकाळी लवकर चर्चेमध्ये गेले होते. दरम्यान, ते परत आले तेव्हा त्यांना घरात कोणीच लक्षात आले. त्यांनी लिसा आणि बेन यांचा तपास सुरू केला.सगळीकडे शोधल्यानंतर त्यांनी विहिरीतही शोध घेतला. केरळ अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढले. २८ दिवसांच्या बाळाच्या मृत्यूनंतर लिसाला धक्का बसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी लिसाच्या आणखी एका मुलाचाही मृत्यू झाला होता यामुळे ती दु:खात होती असंही नातेवाईकांनी सांगितले.