एका महिलेने स्कॅम करण्यासाठी 17 वेळा गरोदर असल्याचं नाटक केलं आहे. पोटाला उशी बांधून ती सर्वत्र फिरायची. महिलेने तब्बल 98 लाखांची फसवणूक केली असून सध्या ती जेलमध्ये आहे. हे पैसे सरकारने मुलांसाठी आर्थिक मदत म्हणून दिले होते. बारबरा आयोले असं या 50 वर्षीय महिलेचं नाव आहे. प्रेग्नेंसीचं नाटक करून महिला फक्त सरकारी आर्थिक मदतीचा फायदा घेत नव्हती तर ती वारंवार ऑफिसमधून मोठी सुट्टी देखील घेत होती.
2000 पासून ती हे नाटक करत आहे, म्हणजेच 24 वर्षांपासून ती फसवणूक करत होती. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, जेव्हा बारबराला याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तिने सांगितलं की, केवळ 5 प्रेग्नेंसी यशस्वी झाल्या आहेत आणि 12 वेळा गर्भपात झाला. तिने सांगितलं की, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ती शेवटची गर्भवती राहिली होती. त्यावर पोलिसांनी ती खोटे बोलत असल्याचं सांगितलं. या संपूर्ण 9 महिन्यांत पोलिसांची तिच्यावर नजर होती.
बारबरावर आरोप आहे की, तिने पोटावर एक उशी बांधली आहे जेणेकरून लोकांना वाटेल की ती गर्भवती आहे. तिचा 55 वर्षीय पार्टनर डेव्हिड पिझिनाटो याने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं की, त्याला चांगलंच माहितीय की बारबरा प्रत्यक्षात कधीच गरोदर राहिली नाही. मात्र, या फसवणूक प्रकरणात डेव्हिडचा देखील सहभाग असण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत पोलीस त्याची पुन्हा चौकशी करू शकतात.