पतीला देत होती स्लो पॉयजन, प्रियकराला बनवलं भाऊ; Whatsapp चॅटींगमधून झाला भांडाफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 09:28 AM2023-02-13T09:28:02+5:302023-02-13T09:28:16+5:30
Crime News : येथील महालक्ष्मी नगरमध्ये हितेश पाल आपल्या परिवारासोबत राहत होता. त्याच्या पत्नीचं नाव नीतू आहे.
Crime News : मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदुरमध्ये पत्नी अनैतिक संबंधाला कंटाळून एका व्यक्तीने धक्कादायक पाउल उचललं. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पण हे जग सोडून जाण्याआधी त्याने एक सुसाइड नोट लिहिली. यात त्याने त्याच्या पत्नीच्या कारनाम्यांचा भांडाफोड केला. या नोटमधील गोष्टी वाचून सगळेच हैराण झाले.
येथील महालक्ष्मी नगरमध्ये हितेश पाल आपल्या परिवारासोबत राहत होता. त्याच्या पत्नीचं नाव नीतू आहे. हितेश तेव्हा चांगलाच धक्का बसला जेव्हा त्याला पत्नीच्या अनैतिक संबंधांबाबत समजलं. आत्महत्या करण्याआधी हितेशने सुसाइड नोटमध्ये लिहिलं की, 'माझी पत्नी नीतूचे कृष्णा राठोरसोबत अनैतिक संबंध आहेत. हे लोक मला मारण्याची धमकी देत आहेत. दोघांना अनेकदा मी सोबत पकडलं आहे. नीतू घरात तंत्र-मंत्रही करते. काही दिवसांआधी नीतूला मी कृष्णासोबत बागेत पकडलं होतं'.
त्यानंतर त्याने लिहिलं की, दोघांच्या व्हॉट्सअॅप चॅटींगवर गेल्या काही दिवसांपासून तो नजर ठेवून होता. यादरम्यान समजलं की, बागेतून नीतू कृष्णाच्या रूमवर जात होती. ती कृष्णाला महागडे गिफ्ट देत होती आणि त्याला सांगत होती की, तो माझा भाऊ आहे. धक्कादायक बाब म्हणजे नीतूने काही दिवसांआधी प्रियकर कृष्णाला कार गिफ्ट केली होती. ही कार नीतूच्या नावावर आहे. या प्रकरणात आणखी एक महिला सहभागी आहे. तिचं नाव राणी उदासी आहे.
हितेशने पुढे लिहिलं की, 'नीतू, कृष्णा आणि राणी मिळून घरात तंत्र-मंत्र करत होती. गेल्या एक वर्षापासून ती स्लो पॉयझन देत आहे. यामुळे मी सुस्त झालो. माझं शरीर काळं पडलं. हे सगळं पोस्टमार्टममधून समोर येईलच. पोलिसांना विनंती आहे की, त्यांनी सगळ्यांची चॅटींग चेक करावं आणि त्यांना शिक्षा द्यावी. नीतूने मला काही खाऊ घालून सगळी संपत्ती आपल्या नावावर केली आहे'.
त्याने पुढे लिहिलं की, 'माझ्या मृत्यूनंतर मुलगा युवराज आणि आई-वडिलांना ही संपत्ती दिली जावी. ती मला मारणार होती. त्यामुळे ती सगळीकडे नॉमिनीमध्ये तिचं नाव लिहिलं आहे'. त्याने सुसाइड नोटमध्ये इतरही अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. सोबतच काही लोकांचे धन्यवादही मानले. पोलिसांनी सांगितलं की, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतकाच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचं समोर आलं आहे. लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल.