Hyderabad: तेलंगणामधून अपहरणाची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे फिल्मी स्टाइलने डेंटल कॉलेजमध्ये शिकत असलेल्या 24 वर्षीय तरूणीचं शुक्रवारी अपहरण करण्यात आलं. महत्वाची बाब म्हणजे काही वेळानेच तिचा साखरपुडा होणार होता. कार आणि ट्रकचा ताफा घेऊन आलेल्या काही गुंडांनी तरूणीच्या घराला वेढा दिला. साधारण अर्धा तास खूप गोंधळ घातला. ज्यात तिच्या वडिलांसहीत पाच लोकांनी गंभीर जखमा झाल्या. त्यानंतर तरूणीचं अपहरण करण्यात आलं.
घटनेदरम्यान शेजाऱ्यांनी लागोपाठ पोलिसांनी फोन करून याची सूचना दिली. तरीही पोलीस सीमेच्या बाहेर होते. गुंडांनी ओळख लपवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तोडले होते. मुख्य आरोपीचं नाव नवीन रेड्डी आहे जो एका महागड्या वेबरेज मिस्टर टी चा मालक आहे. आरोपीने वैशालीला वरच्या मजल्यावरून खाली खेचत आणलं आणि तिला कारमध्ये बसवून फरार झाला.
त्यानंतर पोलिसांनी रात्री उशीरापर्यंत ऑपरेशन चालवलं आणि आठ गुंडांना अटक केली. मुख्य आरोपी नवीन अजूनही फरार आहे. वैशालीचा शोध सुरू होता. साधाऱण 8 तासांच्या शोधानंतर रात्री शहराच्या बाहेरील भागात तरूणी आढळून आली.
तरूणीचे वडील दामोदर रेड्डी म्हणाले की, 'माझ्या मुलीचा साखरपुडा दुपारी होणार होता. पण तिचं अपहरण करण्यात आलं. तिला 11 वाजता एका कारमधून नेण्यात आलं. डोक्यावर लोखंडी रॉडने वार केल्यावर मी बेशुद्ध झालो होतो. मी शुद्धीवर येईपर्यंत वैशाली गायब होती. परिवारातील अनेक सदस्यांना मारण्यात आलं'.
आरोप आहे की, पोलिसांनी त्यांच्या फोनला उत्तर दिलं नाही आणि त्यामुळेच गुंडांचं मनोबल वाढलं. नंतर आरोपीच्या चहाच्या दुकानाला काही लोकांनी आगीच्या हवाले केलं. रस्त्याही जाम करण्यात आला होता. वैशालीच्या घरची सगळी घटना एका सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाली. कॅमेरात दिसत आहे की, गुडांनी तिच्या घरासमोर उभ्या असलेल्या कारचीही तोडफोड केली. लोकांनाही धमकावलं.
एकतर्फी प्रेम
वैशालीच्या परिवारानुसार, त्यांची मुलगी नवीनला काही महिन्यांआधी एका स्थानिक बॅडमिंटन टूर्नामेंटमध्ये भेटली होती. नवीनने वैशालीच्या आई-वडिलांकडे तिच्यासोबत लग्नाची इच्छा व्यक्त केली. वैशालीचे वडील म्हणाले की, मी माझ्या मुलीला याबाबत विचारलं तर तिने नकार दिला. त्यानंतर नवीनने राजकीय नेत्यांच्या माध्यमातून दबाव टाकणं सुरू केलं. पण आम्ही स्पष्ट सांगितलं होतं की, आम्हाला काही इंटरेस्ट नाही. यावर नाराज होऊन नवीनने वैशालीच्या घरासमोरच त्याच्या घराचं बांधकाम सुरू केलं. वैशालीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी चार्जशीट दाखल केली नाही.
दमोदर यांना तक्रार करण्याच्या अडचणी आठवल्या. राचकोंडाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सुधीर बाबू हे महेश भागवत यांच्या अनुपस्थितीत प्रभारी आहेत त्यांनी वैशालीच्या आईसोबत बोलणी केली. त्यांनी मुलीच्या बचावाचं आश्वासन दिलं होतं.