शहरं
Join us  
Trending Stories
1
Baba Siddique : 'ती' पोस्ट करणारा अकोल्याचा शुभम लोणकर भावासह फरार, पोलिसांकडून शोध
2
बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे 'रिअल इस्टेट' कनेक्शन?; केआरकेच्या पोस्टमुळे नवी चर्चा
3
Baba Siddique यांना खरंच वाय दर्जाची सुरक्षा होती का? अखेर उत्तर मिळालं
4
बाबा सिद्दिकी हत्याकांडातील चौथ्या आरोपीची ओळख पटली; पोलीस जसीन अख्तरच्या मागावर
5
नाशिकमध्ये अग्निवीरांचा मृत्यू; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदी-राजनाथ सिंहांना तीन सवाल
6
'महाराष्ट्र राजकीय परिवर्तनासाठी सज्ज', विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
7
१६ ऑक्टोबरला नवीन पल्सर लाँच होणार? पहिल्या सीएनजी बाईकला टक्कर देणार!
8
चांदीने १ लाखाचा टप्पा केला पार; जाणून घ्या कोणत्या शहरात किती दर?
9
बाबा सिद्दिकी हत्या : एका आरोपीला पोलीस कोठडी, तर दुसऱ्याला..., न्यायालयाचा आदेश काय?
10
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी केली फेसबुक पोस्ट; पोलिस घरी पोहोचले, त्याआधीच शुभम झाला गायब
11
Baba Siddique : "२०१९ ला जेलमध्ये गेला, जामीन कसा मिळाला माहीत नाही; ११ वर्षांपूर्वीच घरातून हाकलून दिलं"
12
"उद्धव ठाकरे, सारखं वाघनखं काढतंय; एकनाथ शिंदे, ते एक पुष्पा वेगळंच"; राज ठाकरे बरसले
13
"मी तुमचा चित्रपट बनवेन - एक था MLA", दाऊद इब्राहिमनं एकदा बाबा सिद्दिकींना दिली होती धमकी
14
मोदींच्या 'त्या' विधानावर शरद पवारांनी ठेवलं बोट; म्हणाले, "आम्ही बदनामी करू इच्छित नाही, पण..."
15
"धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार", देवेंद्र फडणवीसांची ग्वाही
16
"मी त्यांना कधीही हसताना..."; रतन टाटांच्या निधनाच्या तीन दिवसानंतर शंतनु नायडूंनी केली भावूक पोस्ट
17
"मला एक खून माफ करा...", राज ठाकरेंची थेट राष्ट्रपतींकडे विनंती; मेळाव्यात असं का म्हणाले?
18
Baba Siddique : "पुण्याला जातो सांगितलं, माझा मुलगा..."; बाबा सिद्दिकींची हत्या करणाऱ्या शिवाच्या आईची प्रतिक्रिया
19
'या लोकांना संपूर्ण देशात गुंडा राज आणायचे आहे', बाबा सिद्दिकी हत्याकांडावर केजरीवाल संतापले
20
"गृहमंत्र्यासोबत मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आम्ही नाकारत नाही"; बाबा सिद्दिकींच्या हत्येवरुन शिंदे गटाचे मंत्री स्पष्टच बोलले

बहिणीच्या दिरासोबत ठरलं होतं लग्न, पण अफेअर दुसरीकडे सुरू होतं; मग उचललं धक्कादायक पाउल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 11:41 AM

Crime News : लग्न ठरल्यानंतर प्रेयसीच्या होणाऱ्या पतीला संपवण्यासाठी प्रियकराने आपल्या साथीदारांसोबत मिळून प्लान केला. एका ठिकाणी त्याला बोलवून धारदार हत्याराने त्याचा गळा कापून त्याची हत्या केली. 

Crime News : उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यात पोलिसांनी एका तरूणाच्या हत्येचा खुलासा करत तीन लोकांना अटक करून तुरूंगात पाठवलं आहे. पोलिसांनुसार, अटक करण्यात आलेल्या एका तरूणीचं लग्न मृत तरूणासोबत ठरलं होतं. पण तिला तिच्या प्रियकरासोबत लग्न करायचं होतं. लग्न ठरल्यानंतर प्रेयसीच्या होणाऱ्या पतीला संपवण्यासाठी प्रियकराने आपल्या साथीदारांसोबत मिळून प्लान केला. एका ठिकाणी त्याला बोलवून धारदार हत्याराने त्याचा गळा कापून त्याची हत्या केली. 

तपस्वी नगर मोदी गार्डनमध्ये बुधवारी झालेल्या हत्येचा खुलासा पोलिसांनी 24 तासातच केला. त्यानंतर यात सामिल मृत व्यक्तीची होणारी पत्नी, तिचा प्रियकर आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. पोलिसांनुसार तरूणीनेच तिच्या प्रियकरासोबत आणि त्याच्या साथीदारासोबत मिळून शत्रुघ्न पाल याची हत्या केली. 

26 एप्रिलच्या रात्री 9 वाजता मलाका गावात राहणारा शत्रुघन पाल त्याचा मित्र छोटू पासवानसोबत बहुआ रोड मोदी मैदानात गेला होता. जिथे शत्रुघनला भेटण्यासाठी आलेल आरोपी महेश आणि त्याच्या मित्रांनी दारू प्यायली. दारू संपल्यावर छोटूला दारू आणण्यासाठी पाठवलं. यादरम्यान महेश आणि त्याच्या साथीदारांनी शत्रुघनची हत्या केली. जेव्हा छोटू परत आला तेव्हा मित्राला रक्ताच्या थारोळ्यात पाहून जोरजोरात ओरडला. तेव्हा दोन्ही आरोपी आपली बाइक सोडून मृतकाची बाइक घेऊन फरार झाले.

बाइकच्या नंबरवरूनच समजलं की, मृतकाच्या मोठ्या भावाने आपल्या मेहुणीसोबत मृतकाचं लग्न ठरवलं होतं. नंतर चौकशीतून समोर आलं की, तरूणीचा प्रियकर महेश आहे. एक वर्षापासून त्यांचं अफेअर सुरू होतं. अशात भाओजीने तिचं लग्न आपल्या भावासोबत ठरवलं. दोन महिन्यांनी लग्न होणार होतं. तेच पोलिसांनी हत्येचा खुलासा करत आरोपी महेश, तरूणी ननकी उर्फ अंजली आणि महेशच्या मित्राला अटक केली.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी