पाचव्या पत्नीची बेवफाई, झोपेच्या गोळ्या दिल्या अन् कुऱ्हाडीने कापला प्रायव्हेट पार्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 07:32 PM2023-03-03T19:32:27+5:302023-03-03T19:33:22+5:30
Crime News : सध्या पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून तिची कारागृहात रवानगी केली आहे.
सिंगरौली - मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका महिलेने आपल्या पतीच्या प्रायव्हेट पार्टवर कुऱ्हाडीने हल्ला करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरेंद्र गुर्जर असे मृत व्यक्तीचे नाव असून, त्याने पाच लग्ने केली होती. दरम्यान हत्या करणारी कांचन गुर्जर नावाची महिला त्याची पाचवी पत्नी होती. सध्या पोलिसांनी आरोपी महिलेला अटक करून तिची कारागृहात रवानगी केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांचे म्हणणे आहे की, वीरेंद्र गुर्जर यांचा मृतदेह २१ फेब्रुवारीला सापडला होता. यावेळी पोलिसांना त्यांच्या मानेवर आणि प्रायव्हेट पार्टवर गंभीर जखमा आढळल्या. त्याचवेळी, वीरेंद्र गुर्जर यांची पत्नी कांचन हिने याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती, त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली. यादरम्यान पोलिसांनी वीरेंद्र गुर्जर यांच्या अनेक जवळच्या नातेवाईकांसह सर्व संशयितांची चौकशी केली. त्यावेळी वीरेंद्र गुर्जर यांची पत्नीही पोलिसांच्या निशाण्यावर आली.
पोलिसांना पत्नीवर संशय आल्याने तिला ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र पत्नीने सुरुवातीला ही घटना साफ फेटाळून लावली. यादरम्यान, पोलिसांनी तिची कडक चौकशी केली असता तिनेच हत्या केल्याचा खुलासा केला. घटनेचा खुलासा करताना आरोपी पत्नीने पोलिसांना सांगितले की, वीरेंद्र गुर्जर यांना दारूचे व्यसन आहे. ते दारूच्या नशेत असताना तिला त्रास देत होते. त्यामुळे 21 फेब्रुवारीच्या रात्री पतीच्या जेवणात झोपेच्या 20 गोळ्या मिसळल्या होत्या, त्यानंतर पती बेशुद्ध झाल्यावर आधी पतीवर कुऱ्हाडीने वार केले. त्यानंतर प्रायव्हेट पार्ट कापल्यानंतर तो जागीच ठार झाला.
गुन्हा केल्यानंतर आरोपी पत्नीने पतीचा मृतदेह कापडात गुंडाळून रस्त्याच्या कडेला फेकून दिला होता. तसेच पुरावे नष्ट करण्यासाठी पतीचे कपडे आणि चप्पलही जाळण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपी महिलेविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला कांचन गुर्जर ही वीरेंद्र गुर्जर यांची पाचवी पत्नी होती. सध्या पोलिसांनी आरोपी महिलेला कारागृहात पाठवले आहे.