अमेरिकेच्या(US) नॉर्थ कॅरोलिनामध्ये एका महिलेला कोर्टाने ४० वर्षाची शिक्षा सुनावली आहे. महिलेवर आरोप आहे की, तिने तिच्या लहान बहिणीसोबत आणि वडिलांसोबत मिळून थॉमस नावाच्या व्यक्तीची (Woman Kills Sister's Boyfriend) हत्या केली. थॉमस आरोपी महिलेच्या लहा बहिणीचा बॉयफ्रेन्ड होता. तिघांनी त्याला ३ दिवस टॉर्चर केलं नंतर त्याची हत्या केली.
डेली मेलमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, बॉयफ्रेन्ड थॉमसला मारण्याआधी तिघांनी त्याला ड्रग्स दिलं आणि नंतर मारहाण केली. त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह दफन केला आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. अमांडा आणि तिचे वडील लॅरीने थॉमसला जीवे मारल्याच्या तीन आठवड्यानंतर वर्जीनियामध्ये (Daughter Weds Father) लग्न केलं.
आरोपी महिलेचं नाव अन्ना मेरी आहे. तिचं वय ३३ वर्षे आहे. कोर्टाने गेल्यावर्षी ३१ ऑक्टोबरला या प्रकरणात आरोपीची लहान बहीण अमांडाला ४० वर्षाची शिक्षा आणि वडील लॅरी मॅक्लूरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. (हे पण वाचा : ज्या रेप केससाठी 'तो' तुरूंगात कैद होता तो त्याने केलाच नाही, DNA टेस्टमुळे झाला खुलासा!)
प्लॅन करून बॉयफ्रेन्डचा केला खात्मा
तपासातून समोर आले की, अमांडा आणि तिचा बॉयफ्रेन्ड बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. दोघेही इंडियाना स्टेटमध्ये राहत होते. एक दिवस त्यांची गाडी बिघडली. ज्यानंतर अमांडाचे वडील लॅरी आणि तिची बहीण अन्ना इंडियाना येथे आले आणि दोघांना वर्जीनियाला घेऊन गेले. लॅरीला म्हणजे अमांडाच्या वडिलाला अमांडासोबत लग्न करायचं होतं. पण त्यात बॉयफ्रेन्ड आडकाठी ठरत असल्याने त्याची हत्या केल्याचं कारण समोर आलं आहे. (हे पण वाचा : वाह रे न्याय! शंख वाजव, गायत्री मंत्राचा जप कर, पत्नीची तक्रार घेऊन गेलेल्या व्यक्तीला पोलिसांचा सल्ला!)
काय झालं त्या दिवशी?
चौकशी दरम्यान अन्नाने सांगितले की, लॅरीने थॉमससोबत ट्रस्ट गेम खेळण्यास सांगितले आणि नंतर आम्ही थॉमसचे पाय बांधले. त्यानंतर आम्ही त्याला ड्रग्स दिलं. नंतर त्याला मारलं. जेव्हा तो सुटकेसाठी धडपड करत होता तेव्हा अमांडाने त्याच्या डोक्यात वाइनची बॉटल मारली. नंतर आम्ही त्याचा मृतदेह एका काळ्या बॅगेत भरून दफन केला.