राजस्थानच्या (Rajasthan) जोधपुरमधून माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील मंडोरमधील बालिका सुधारगृहातून पळालेल्या एका विवाहित महिलेसोबत दोन लोकांनी रेप (Women Raped) केला. अधिकारी मनीष देव यांनी सांगितलं की, विवाहितेसोबत एका आरोपीने त्याच्या रूमवर तर दुसऱ्या आरोपीने त्याच्या कारमध्ये अत्याचार केला. त्यानंतर महिलेला प्रतापनगर बस स्टॅन्डला सोडलं.
या घटनेचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा बालिका सुधार गृहाची संचालिकेने मंडोर पोलीस स्टेशनमध्ये महिला पळून गेल्याची तक्रार दाखल केली आणि पोलीस तिला शोधत तिच्या गावी गेले. तेव्हा महिलेने सांगितलं की, तिच्यासोबत दोन लोकांनी रेप केला. पोलिसांनी नंतर महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले जिथे जिथे ती गेली होती.
पोलिसांनी यादरम्यान काही पुरावे सापडले आणि त्यांच्या आधारे त्यांनी दोन्ही आरोपींना अटक केली. कसून चौकशी केल्यावर दोन्ही आरोपींनी अपला गुन्हा कबूल केला. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्यांना दोन दिवसांच्या रिमांडवर पाठवलं आहे.
एसीपी मंडोर राजेंद्र दिवाकर म्हणाले की, बालिका गृहातून पळून गेलेल्या महिलेला रात्री सोलनपूर रानेरी येथील कुलदीप बिश्नोई भेटला, त्याला तिने बस स्टॅन्ड जाण्यासाठी मदत मागितली. त्यानंतर तो तिला बाइकवर बसवून आपल्या रूमवर घेऊन गेला, जिथे त्याने तिच्यासोबत दुष्कर्म केलं. नंतर त्याने तिला मंडोरजवळ सोडलं.
इथे महिलेला बाबूराम जाट कार ड्रायव्हर भेटला. महिलेने त्यालाही बस स्टॅन्डला जाण्यासाठी मदत मागितली तर त्याने तिला कारमध्ये बसवलं आणि एका अज्ञात ठिकाणी नेऊन तिच्यासोबत दुष्कर्म केलं. नंतर त्याने महिलेला प्रतापनगर बस स्टॅन्डला सोडलं. तिथून महिला तिच्या गावी गेली.
पोलिसांनी एक टीम महिलेला पकडण्यासाठी तिच्या गावी गेली असताना महिलेने तिच्यासोबत घडलेला हा सगळा प्रकार सांगितली. पोलिसांनी याप्रकरणी २३ वर्षीय कुलदीप बिश्नोई आणि २२ वर्षीय बाबूराम जाट याला अटक केली.
रिपोर्टनुसार, आपल्या नणंदेच्या हत्येप्रकरणी महिलेला गेल्यावर्षी बालिका गृहात पाठवण्यात आलं होतं. तेव्हा ती अल्पवयीन होती. तिने पोलिसांना सांगितलं की, तिला बऱ्याच दिवसांपासून वडील आणि आपल्या अडीच वर्षाच्या मुलीची खूप आठवण येत होती. ज्यामुळे ती बालिका सुधार गृहातून पळून गेली होती. पण घरी पोहोचण्याआधी तिच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडली.