जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 21 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागवला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगभरात शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. अनेक देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 'मला कोरोना झाला आहे' असं म्हणत एक महिला तब्बल 25 लाखांच्या खाद्यपदार्थांवर थुंकल्य़ाची भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
अमेरिकेमध्ये ही घटना घडली आहे. एक महिला सुपरमार्केटमध्ये आल्यावर शिंकली. तसेच तिथे ठेवण्यात आलेल्या खाद्यपदार्थांवर देखील थुंकली. तसेच तिने हे कृत्य केल्यावर मी कोरोना पॉझिटिव्ह आहे असं मोठमोठ्याने ओरडण्यास सुरुवात केली. यानंतर तिने ही घटना म्हणजे फक्त एक फ्रँक असल्याचं म्हटलं आहे. मात्र य़ा प्रकरणी महिलेला दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 37 वर्षीय मार्गेरेट एन सिरको सुपरमार्केटमध्ये आली होती. तिने शिंकायला सुरुवात केली. तसेच सर्वांना कोरोना होईल आणि सर्वच जण मरून जातील असं देखील ती म्हणू लागली.
पोलिसांनी या महिलेला अटक केली असून दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मार्गेरेटच्या धक्कादायक प्रकारानंतर सुपरमार्केटमधील 35 हजार ड़ॉलर्सचं सामना हे फेकून देण्यात आलं आहे. तसेच तिथे उपस्थित असलेले लोक आणि मार्केटमधील स्टाफमध्ये यामुळे भीतीचे वातावरण होते. सुपरमार्केटचा मालक जोए फासुलाने हा भयंकर प्रकार फेसबुकवर शेअर केला आहे. मार्गेरेट ही कोरोना पॉझिटिव्ह नसून तिने नशेत हे कृत्य केलं. तिची मानसिक अवस्था ठीक नसल्याचं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बापरे! कोरोना लस घेतल्यावर 16 वर्षीय मुलाला हार्ट अटॅक; सरकार देणार 1.5 कोटी, 'या' देशात खळबळ
कोरोनामुळे अनेक देशांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून डेल्टा व्हेरिएंटचा कहर दिसून येत आहे. याच दरम्यान लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून कोट्यवधी लोकांनी आतापर्यंत कोरोनाची लस घेतली आहे. कोरोना लसीचे अनेक साईडइफेक्ट पाहायला मिळत आहे. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. कोरोना लस घेतल्यानंतर एका 16 वर्षांच्या मुलाला हृदयविकाराचा झटका आला आहे. सिंगापूरमध्ये हा भयंकर प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर सरकारने त्याला मोठी नुकसानभरपाई दिली आहे. सिंगापूर सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय मुलाने फायझर (Pfizer vaccine) लसीचा डोस घेतला होता. हा डोस घेतल्यानंतर सहा दिवसांमध्येच त्याला हृदयविकाराचा झटका आला. लस घेतल्यानंतर हा धक्का बसल्यामुळे मुलाने सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी केली. सरकारने परिस्थितीची माहिती करुन घेत, त्याला 2 लाख 25 हजार डॉलर्स म्हणजेच जवळपास दीड कोटी देण्याची घोषणा केली.