लोकमत न्युज नेटवर्कजामनेर (जि.जळगाव) : बोदवड रस्त्यावरील वाडीकील्ला घाटाजवळील वळणावर चारचाकी वाहन उलटले. त्यात अकोला येथील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी पावणे दहाचे सुमारास घडली. ही महिला नातेवाईकाच्या अंत्ययात्रेसाठी येत असतांना तिलाच मृत्यूने गाठले.
वाहनातील अन्य तीन जण जखमी आहे. अबेदाबी शेख इसाक (५५, रा.अकोला) असे या ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
जामनेर येथील नातेवाईकांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी अकोला येथून येत असलेल्या वाहनास हा अपघात झाला. जामिल्खान नावाजखान (५५), शेख सुभान शेख मेहबूब (५८) व जाहिदाबी अब्रार अहमद (सर्व राहणार अकोला) अशी जखमींची नावे आहे. अपघातचची माहिती मिळताच सर्वाना उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना खाजगी हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले. जखमींवर उपचार सुरु आहे.