मुंबई - अमली पदार्थाविरोधी मोहिमेसाठी पोलिसांनी कंबर कसली अाहे. त्यामुळे तस्करांनी आता अंमली पदार्थ पोचवण्यासाठी महिलांचा वापर करण्यास सुरूवात केल्याचं अनेक कारवायातून उघडकीस अालं अाहे. नुकतंच मुंबई अमली पदार्थ विभाग आणि केंद्रीय अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी ) ४६५ ग्रॅम अॅफेटामाइन ड्रग्जसह एका २७ वर्षीय महिलेला अटक केली आहे. अमली पदार्थ मुंबईत तस्करीसाठी आणले असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली. एका महिला दलालाच्या मदतीने हे अमली पदार्थ मुंबईत विकले जाणार असल्याचे उघडकीस आल्यानंतर बुधवारी सकाळी पोलिसांनी एका संशयित महिलेला कांदिवलीतून ताब्यात घेतल आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
अॅफेटामाइन ड्रग्जची तस्करी करणाऱ्या महिलेला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 8:41 PM