जमीर काझी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एकीकडे सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्याहून सरस कामगिरी महिलांकडून होत असताना राज्यात महिलांवर अत्याचार सुरूच आहेत. विशेष म्हणजे बहुतांश पीडितांना त्यांच्या माहितीतील विकृताकडून अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. बलात्काराच्या गुन्ह्यांत तीन वर्षांत पोलिसांनी १४ हजार ७७ जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे त्यापैकी ९५ टक्क्यांहून अधिक म्हणजे तब्बल १३,७३२ आरोपी हे फिर्यादीच्या परिचितांपैकीच आहेत.
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांपैकी काही नात्यातील तर काही मित्र असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. महाराष्टÑात ३ वर्षांत राज्यातील विविध ४६ पोलीस घटकांमध्ये बलात्काराचे १३ हजार ३३२ गुन्हे दाखल आहेत. त्या प्रकरणी पोलिसांनी एकूण १४ हजार ७७ जणांना अटक केली आहे. त्यामध्ये केवळ ३४५ जणांना पीडिता ओळखत नव्हत्या. अन्य सर्व १३ हजार ७३२ आरोपी त्यांच्या नित्य पाहणीतील होते. तर, काही प्रकरणांमध्ये अनेक वर्षांपासून परिचयातील होते. बेसावध असताना त्यांच्यावर बळजबरी करण्यात आली.काही आरोपी हे पीडितांचे पूर्वाश्रमीचे मित्र होते; मात्र काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाल्यानंतर त्यांनी बदला घेण्यासाठी बळजबरी केल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे.
यामध्ये काही गुन्ह्यांत अटक झाल्यानंतर विकृतांनी तक्रार मागे घेण्यासाठी विविध माध्यमांतून दबाव टाकल्याच्या तक्रारीही दाखल झाल्या आहेत. तर काही प्रकरणांमध्ये दबावाला बळी पडून फिर्यादीकडून न्यायालयात व न्यायालयाबाहेर तडजोडी करून गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. (समाप्त)तपासादरम्यान फसवणुकीचे कलमबलात्कार, विनयभंग प्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये पीडितांकडून आरोपीशी भांडण, मतभेद झाल्याने गुन्हे दाखल केल्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे न्यायालयात टिकत नाहीत. तपासादरम्यान भादंवि कलम ३७६, ३०७ ही कलमे हटवून फसवणुकीचे म्हणजे भादंवि ४२० हे कलम लावण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.