वर्धा : महिला बँक कर्मचाऱ्यावर हॉटेलच्या खोलीत चार दिवस डांबून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आल्याने शहरात चांगलीच खळबळ उडाली. शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पोलीसांचे पथक बुधवारी आरोपीच्या शोधात उस्मानाबादला रवाना झाले आहे.
लातूर जिल्ह्यातील खंडपार तालुक्याच्या युवतीवर उस्मानाबाद येथील रहिवासी आरोपी कुणाल पवार याने वर्ध्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये एका खोलीत डांबून तब्बल चार दिवस अत्याचार केला. पीडितेने या प्रकरणाची लातूर पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र, घटनास्थळ वर्धा येथे असल्याने प्रकरण शहर ठाण्यात वर्ग करण्यात आले. वर्धा शहर पोलिसांनी मंगळवारी आरोपी कुणाल पवार विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन पुढील तपास पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.
आरोपी कुणाल पवारविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन पोलिसांचे पथक आरोपीला अटक करण्यासाठी बुधवारी उस्मानाबाद येथे रवाना झाले. याप्रकरणी शहरातील हॉटेलमालकांचे आणि तेथील काम करणाºयांचे बयाण नोंदविण्यात आले. - योगेश पारधी, पोलीस निरीक्षक, वर्धा
सीसीटीव्ही फूटेजची तपासणीशहरातील ज्या हॉटेलमध्ये पीडितेवर अत्याचार करण्यात आला होता. त्या हॉटेलमधील सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी हॉटेलमालकाला मागितले आहे. सीसीटीव्ही फूटेजची संपूर्ण तपासणी करण्यात येत आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.