शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
3
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
4
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
5
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
6
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
7
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
8
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
9
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
10
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
11
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
12
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
13
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
14
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
15
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
16
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
17
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
18
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
19
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
20
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 

कपाळावर टिकली, हातात बांगड्या अन् साडी; मुलीप्रमाणे मेकअप करून विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 2:47 PM

दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे.

पश्चिम बंगालमधील सिलीगुडीमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. कुटुंबीय घराबाहेर गेल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे एखाद्या महिलेप्रमाणे त्याने कपडे घातले होते.  साडी नेसली होती. त्याच्या हातात बांगड्या व चेहऱ्यावर मेकअपही दिसत होता. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

सिलीगुडी मेट्रोपॉलिटन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. पश्चिम बंगालच्या सिलीगुडी शहरातील दक्षिण शांतिनगर भागात हा धक्कादायक प्रकार घडला. आत्महत्या करणारा मुलगा दहावीत शिकत असून तो सध्या परीक्षेची तयारी करत होता. मुलाने आत्महत्या केली तेव्हा त्याचे कुटुंबीय घराबाहेर गेलेले होते. त्याने एखाद्या मुलीप्रमाणे हातात बांगड्या, टिकली आणि साडी नेसली होती. शेजाऱ्यामुळे हा प्रकार समोर आला. 

विद्यार्थ्याच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, मुलाने गळफास घेतला तेव्हा त्याच्या घरातून मोठ्याने ओरडण्याचा आवाज झाला. तेव्हा शेजारी राहणारे नागरिक तत्काळ त्याच्या घरी पोहोचले. घरातली परिस्थिती पाहून सर्वांनाच धक्का बसला. मुलगा फासावर लटकलेला होता आणि त्याने महिलांप्रमाणे कपडे घातले होते. शेजाऱ्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला.

मुलाला याआधी कधीही महिलांचे कपडे घातलेल्या स्थितीत पाहिलं नव्हतं. त्याची अशी आवड होती, असंही कधी जाणवलं नव्हतं. तो मुलगा फारच सभ्य होता. मुलाला कुठलंही व्यसन असल्याचंही कधीही दिसलं नव्हतं अशी माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. मुलाचा मृतदेह पाहून शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला असून अधिक तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी