कल्याण - केडीएमसी मुख्यालयात उपमहापौरास शिवीगाळ आणि जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकामप्रकरणी उपमहापौर लक्षवेधी मांडणार होत्या. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या उपमहापौर कार्यालयात येवून उपमहापौर यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्याऱ्या उमेश साळुंखे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे साळुंखे याने रहदारीच्या रस्त्यावर अनधिकृतपणे बांधकाम केल्यानंतर महापालिका प्रशासनाने दखल न घेतल्याने उपमहापौर गुरुवारच्या महासभेत लक्षवेधी मांडणार असल्याची माहिती मिळताच साळुंखे याने हा प्रकार केला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेंतर्गत येणाऱ्या टिटवाळा-मांडा या भागात रस्त्यावर काही बांधकाम करण्यात आले आहे. या बांधकामांविरोधात स्थानिक नागरिकांनी उपमहापौर यांच्याकडे तक्रार केली होती. बांधकाम उमेश साळुंखे या व्यक्तीने केले आहे. उपमहापौर यांनी बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, पालिका प्रशासनाने दखल घेतली नाही. अखेर गुरुवारच्या महासभेत यांनी या विषयावर महासभेत लक्षवेधी मांडण्याचा निर्णय घेतला. याची माहिती उमेश साळुंखेला मिळाली. उपमहापौर यांचा आरोप आहे की,साळुंखे त्यांच्या दालनात आला. त्याने चार ते पाच जणांच्या समोर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. इतकेच नाही तर सुरक्षारक्षकालासुद्धा दम दिला. त्यानंतर उपमहापौर यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. या संदर्भात उमेश साळुंखे याचे म्हणणे आहे की,त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्याने आपल्या जागेवरच बांधकाम केले आहे. गुरुवारी जो काही प्रकार झाला त्यावेळी महापालिका अधिकारी सुद्धा उपस्थित होते. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी उमेश साळुंखेविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
केडीएमसीत महिला उपमहापौरास शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 9:13 PM
धमकी देण्याऱ्या उमेश साळुंखे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्देअनधिकृत बांधकामप्रकरणी उपमहापौर लक्षवेधी मांडणार होत्या. उपमहापौर यांनी बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी केली. बांधकाम उमेश साळुंखे या व्यक्तीने केले आहे.