अकोला - अकोल्यामधून अल्पवयीन मुलाच्या लैंगिक शोषणाची (Sexual Abuse) एक धक्कादायक घटना (Akola Crime News) समोर आली आहे. इथे एका महिलेवर अल्पवयीन मुलाचं लैंगिक शोषण केल्यावर आरोप आहे. दरम्यान पोलिसांनी तक्रारीनंतर पॉस्को अॅक्टनुसार, गुन्हा दाखल करत महिलेला अटक केली. २९ वर्षीय आरोपी महिला ही पतीपासून वेगळी राहते आणि एका दालमीलमध्ये कामाला जाते. अशात तिच्याजवळ तिच्या बहिणीची मुलगी असते.
आजतक डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी महिलेची भेट ती जिथे कामाला जाते तिथे एका १७ वर्षीय मुलासोबत झाली होती. नंतर दोघांमध्ये ओळख वाढली. त्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबंधही झाले. ३१ जानेवारीला आरोपी महिला तिच्या मोठ्या बहिणीच्या मुलीला सोडून अचानक गायब झाली. लहान मुलगी रडत होती. हे पाहून आजूबाजूच्या लोकांनी महिलेचा शोध घेतला. पण ती दोन दिवस काही परत आली नाही.
जेव्हा महिला बेपत्ता असल्याची सूचना पोलिसांना देण्यात आली तेव्हा एक अल्पवयीन मुलगाही बेपत्ता असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलीस आधीच त्याचा शोध घेत होते. मात्र, ९ फेब्रुवारीला मुलगा अचानक घरी परतला.पोलिसांनी त्याची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. त्याने जे सांगितलं ते ऐकून सगळेच हैराण झाले.
मुलाने सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी महिलेचा शोध घेतला आणि तिला अटक केली. मुलाच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पॉस्को अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून घेतला. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी महिलेची चौकशी केली जात आहे. त्यानंतर तिला कोर्टात हजर केलं जाईल.