शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

फेसबुकवरची मैत्री पडली महागात; भाईंदरमधील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 8:32 AM

लंडनच्या कथित मित्राने पाच लाख युरो डॉलर किमतीच्या जमीन खरेदीत दिलेल्या कमिशनच्या आमिषाला बळी पडलेल्या एका महिलेची चार लाखांची फसगत झाली आहे.

मीरा रोड : भाईंदरच्या महिलेने फेसबुकवरून केलेली मैत्री आणि लंडनच्या कथित मित्राने पाच लाख युरो डॉलर किमतीच्या जमीन खरेदीत दिलेल्या कमिशनच्या आमिषाला बळी पडलेल्या एका महिलेची चार लाखांची फसगत झाली आहे. यासाठी तिला स्वतःचे दागिने गहाण ठेवावे लागले. याबाबतची तक्रार तिने १९ ऑक्टोबर रोजी पोलिसांत केली.भाईंदर पूर्वेला न्यू गोल्डन नेस्ट भागात राहणाऱ्या वैशाली मनीष राजा यांची फेसबुकवर जॉन्सन मायलो या स्वतःला लंडनचा रहिवासी व अभियंता म्हणवणाऱ्याशी मैत्री झाली. दोघांची फेसबुक व नंतर व्हॉट्सॲपवरून चॅटिंग सुरू झाले. त्याने ५ जुलै रोजी भारतात येणार असे सांगून तसे तिकीट पाठवले व आपण पाच लाख युरो डॉलरची जमीन खरेदी करणार असून त्यातले कमिशन तुम्हाला देईन, असे सांगितले. ५ जुलै रोजी त्याने तिला कॉल करून दिल्ली विमानतळावर आपणास कस्टमच्या अधिकाऱ्यांनी पकडले असून माझ्याकडे भारतीय चलन नसल्याने ५० हजार त्वरित पाठवा, असे सांगितले. त्यानुसार बँक खात्यातून तिने ५० हजार पाठवले. त्याने नंतर परत कॉल करून आणखी साडेतीन लाख मागितले. त्यासाठी तिने स्वतःचे मंगळसूत्र, चेन, कडा व हार असे दागिने सराफाकडे गहाण ठेवून ते पैसे बँक खात्याद्वारे पाठवले. काही वेळाने त्याने पुन्हा कॉल करून आणखी १५ लाखांची मागणी केली. पैसे दिले नाहीस तर मला जेलमध्ये टाकतील व मी मरेन. पण, आपले शेवटचे संभाषण असल्याने त्याला तू जबाबदार असशील, असा कांगावा त्याने केला. तिने कोणते पोलीस आहेत माझ्याशी बोलणे करून दे, असे सांगितल्यावर ते त्याने टाळले. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Facebookफेसबुक