'तिने संसार मोडला...' भिंतीवर सुसाईड नोट लिहून पत्नीने घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 08:22 PM2022-06-12T20:22:11+5:302022-06-12T20:23:13+5:30

Suicide Case : मुलगा न्यायालयात पतीविरुद्ध साक्षीदार होईल, असेही लिहिले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

'Women who stays in kota broke my house ...' The wife wrote a suicide note on the wall and choked | 'तिने संसार मोडला...' भिंतीवर सुसाईड नोट लिहून पत्नीने घेतला गळफास

'तिने संसार मोडला...' भिंतीवर सुसाईड नोट लिहून पत्नीने घेतला गळफास

googlenewsNext

मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात एका महिलेने पतीच्या दगेबाजीला कंटाळून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी भिंतीवर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पतीला मृत्यूला जबाबदार धरण्यात आले आहे. मुलगा न्यायालयात पतीविरुद्ध साक्षीदार होईल, असेही लिहिले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

रविवारी आत्महत्या करण्यापूर्वी फतेहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमा उर्फ ​​ज्योती अग्रवाल (42) यांनी घराच्या भिंतीवर सुसाईड नोट लिहून ठेवली होती. जीवन संपवल्याचा आरोप महिलेने पती दीपक अग्रवालवर केला आहे. महिलेने लिहिले की, माझ्या मृत्यूचे कारण दीपक आहे. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे."

भिंतीवर कोळशाच्या साहाय्याने लिहिले होते, “दीपक अग्रवाल कोटा येथे राहणाऱ्या हिनाशी विवाहबाह्य संबंध होते. कोटाच्या हिनाने मला बरबाद केले. हिना माझ्या संसाराच्या आड आली आहे. तिला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. माझ्याकडे कोटा वालीचे रेकॉर्डिंग आहे. या लोकांनी मला खूप त्रास दिला आहे. माझ्या मुलाला पूर्ण हक्क मिळायला हवा. माझे मुलगा त्यांच्याविरुद्ध साक्ष देईल.
 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमा आणि तिचा पती दीपक यांचा हा दुसरा विवाह होता. दोघांचे 11 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. महिलेला 16 वर्षांचा मुलगाही आहे. सुरुवातीला पती-पत्नीमध्ये सर्व काही सुरळीत चालले, पण नंतर वाद सुरू झाले. मारामारीला कंटाळून उमा इंदूरला आपल्या भावाच्या घरी गेली. मात्र काही दिवसांनी फतेहगडला पतीच्या घरी परतले होते. पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाल्याने महिलेने घरातच गळफास लावून घेतला.


जिल्हा एसपी पंकज श्रीवास्तव यांनी सांगितले की, महिलेचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला. भिंतीवर हिंदी भाषेत सुसाईड नोट लिहिली आहे. सुसाईड नोटचाही तपास सुरू आहे. सध्या मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. फतेहगड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Web Title: 'Women who stays in kota broke my house ...' The wife wrote a suicide note on the wall and choked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.