शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

जागतिक महिला दिनीच महिलेने धावत्या बसखाली उडी मारुन केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 18:10 IST

Suicide Case : सुमारे ६५ वय वर्षे तसेच नऊ वारी साडी नेसलेली महिला स्टेशन रोडवर व्हिनस कॉर्नरनजीक रस्त्यामध्येच आयलॅर्डवर बसली होती.

ठळक मुद्देसंबधीत महिलाचे वय अंदाजे ६५ वर्षे असून त्यांच्या अंगावर हिरव्या रंगाची पांढरे टिपक्या असणारी साडी होती.

कोल्हापूर : कोल्हापूरात स्टेशन रोडवर ६५ वर्षीय एका वृध्देने सोमवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास धावत्या एस.टी. बसच्या चाकाखाली स्वता:ला झोकूुन देऊन आत्महत्या केली. या महिलेचा जागीच मृत्यू झाला. नेहमी गजबजलेल्या या मार्गावर घटना घडल्याने काहीवेळ गोंधळ उडाला. पेहराव्यावरुन ही महिला ग्रामीण भागातील असावी असा पोलिसांचा अंदाज असून सायंकाळपर्यंत त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु होते. महिला दिनी महिलेवर आत्महत्या करण्याची वेळ आल्याने घटनास्थळी नागरीकातून हळहळ व्यक्त केला जात होता.

सुमारे ६५ वय वर्षे तसेच नऊ वारी साडी नेसलेली महिला स्टेशन रोडवर व्हिनस कॉर्नरनजीक रस्त्यामध्येच आयलॅर्डवर बसली होती. सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानकाकडून बाहेर पडलेली एस.टी. बस दसरा चौकाच्या दिशेने जात असताना त्या महिलेने धावत्या एसटी. बसच्या मागील चाकाखाली उडी मारुन आत्महत्या केली. बस चालकाच्या ही बाब लक्षात आली नाही. बसच्या पाठीमागून धावणार्या दुचाकीचालकांच्या ही बाब लक्षात आली, त्यांनी अपघातग्रस्त बस ही दसरा चौकात आडवली. संबधीत महिलेच्या पाठीवरुन बसचे चाक गेल्याने त्या जागीच गतप्राण झाल्या होत्या. या अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाली. तातडीने १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या, त्यांनी मृतदेह तातडीने सीपीआर रु्ग़णालयात नेऊन रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी कमी केली. सायंकाळपर्यत महीलेची ओळख पटली नव्हती.संबधीत महिलाचे वय अंदाजे ६५ वर्षे असून त्यांच्या अंगावर हिरव्या रंगाची पांढरे टिपक्या असणारी साडी होती. पेहराव्यावरुन त्या ग्रामीण भागीतील असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

स्टॅडवरुन हटवलेसंबधीत महिलेने सोमवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक परिसरातही बसखाली झोपून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब आगार सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांना परिसरातून हटवले होते. पण त्यानंतर त्या स्टेशन रोडवर आल्या व त्यांनी आपली जीवनयात्रा एस.टी. बसखाली झोकून देऊन संपवलीच.

आत्महत्येचे व्हीडीओ चित्रण व्हायरलसंबधीत महिला बसखाली आत्महत्या करत असल्याचे परिसरातील सीसी टिव्ही कॅमेरातील फुटेज सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केला. 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीWomenमहिला