जामनेर जि. जळगाव : ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखक भालचंद नेमाडे यांच्या हिंदू : जगण्याची समृध्द अडगळ... या कादंबरीत लभान गोरबंजारा समाजातील महिलांबाबत अपमानजनक लिखाण करण्यात आले आहे. याच्या निषेधार्थ नेमाडे यांच्याविरुद्ध जामनेर पोलिसात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अॅड.भरत पवार यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरुन हा गुन्हा दाखल करण्यात आल आहे. नेमाडे यांना दिलेला ज्ञानपीठ पुरस्कार परत घेण्याची मागणी एका निवेदनात करण्यात आली आहे. राष्ट्रीय बंजारा टायगर्सच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जामनेरचे तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन दिले. त्यात ही मागणी करण्यात आली आहे. पुस्तकाचे प्रकाशक हर्ष भटकळ यांच्याविरुद्वही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावेळी रमेश नाईक, निलेश चव्हाण,मुलचंद नाईक,राजेश नाईक,मदन जाधव, चतरसिंग राठोड, लालचंद चव्हाण, ऐश्वर्या राठोड,अंजु पवार, पुष्पा राठोड, देवीदास राठोड, चेतन नाईक,गणेश राठोड, बाळु चव्हाण, रामकिसन नाईक,किशोर नाईक, चतरसिंग पवार, अॅड.भरत पवार, दीपक चव्हाण, विकास तंवर, संदीप जाधव, अमोल पवार,सोनसिंग राठोड,मोरसिंग राठोड,भुरासिंग राठोड,अक्षय जाधव, दीपक पवार, इंदल जाधव आदी उपस्थित होते. तसेच अॅड.पवार यांच्या तक्रारीवरुन नेमाडे यांच्याविरूद्ध भादंवि कलम ५००,५०१,५०२ अंर्तगत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.