शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

यंदा अजून मुरगाव तालुक्यात १८ जण अमली पदार्थासहीत गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 8:30 PM

जप्त गांजाची किंमत ३ लाख ५५ हजार रुपयांच्या आसपास आहे.

ठळक मुद्दे या प्रकरणात २ किलो ८८ ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणात १८ जणांना गजाआड करण्यात आले.वेर्णा पोलिसांनी या वर्षात अजूनपर्यंत चार जणांना गजाआड करुन त्यांच्याकडून ६८४ ग्रॅम गांजा जप्त केला आहे.तालुक्यात पोलिसांनी २०१९ मध्ये १८ प्रकरणांत अमली पदार्थ पकडून संशयितांविरुद्ध कारवाई केली.

वास्को - मुरगाव तालुक्यात जास्त पर्यटनस्थळे नसली तरी येथे अमली पदार्थांचा व्यवहार मोठया प्रमाणात होत आहे. तालुक्यात पोलिसांनी २०१९ मध्ये १८ प्रकरणांत अमली पदार्थ पकडून संशयितांविरुद्ध कारवाई केली. या प्रकरणात २ किलो ८८ ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणात १८ जणांना गजाआड करण्यात आले. जप्त गांजाची किंमत ३ लाख ५५ हजार रुपयांच्या आसपास आहे.

मुरगाव तालुक्यात दाबोळी विमानतळ, मुरगाव बंदर, रेल्वे स्थानक अशी अनेक महत्त्वाची आस्थापने आहेत. बोगमाळो समुद्र किनारा तसेच अन्य काही मोजकीच पर्यटक स्थळे येथे असली तरी अमली पदार्थाचा व्यवहार मोठया प्रमाणात होत असल्याचे उघड झाले आहे. यावर्षात मुरगाव तालुक्यातील वास्को पोलीसांनी सर्वात जास्त म्हणजे १२ प्रकरणांत कारवाई करुन १ किलो २८३ ग्रॅम गांजा जप्त करून १२ जणांना गजाआड केले. या प्रकरणात वास्को पोलिसांनी जप्त केलेला गांजा २ लाख ४ हजार रुपया किंमतीचा आहे. वेर्णा पोलिसांनी या वर्षात अजूनपर्यंत चार जणांना गजाआड करुन त्यांच्याकडून ६८४ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. त्याची किंमत १ लाख २५ हजार रुपये होते. मुरगाव पोलिसांनी या वर्षात अमली पदार्थांच्या विरुद्ध दोनच कारवाया केल्या असून १२१ ग्रॅम गांजा जप्त करुन दोघाजणांना गजाआड केले. त्यांच्याकडून जप्त करण्यात अलेला गांजा २१ हजार रुपये किमतीचा आहे. मुरगाव तालुक्यात बंदर तसेच अनेक आस्थापने असल्याने येथे मोठया प्रमाणात दुसऱ्या राज्यातून अवजड वाहने येत असून या वाहनांवर नजर ठेवल्याचे पोलीस उपअधीक्षक सुनिता सांवत यांनी सांगितले.पर्यटक हंगामाच्या काळात मुरगाव तालुक्यात गांजा व्यवहार करणाऱ्यांना गजाआड करण्यासाठी पोलीसांची करडी नजर­ - पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंतपर्यटन हंगाम असो किंवा नसो, अमली पदार्थांचा व्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मुरगाव तालुक्यातील वास्को, वेर्णा तसेच मुरगाव पोलीस सतर्क आहेत. गोव्यातील पर्यटक हंगामाची सुरवात झाली असून ह्या काळात अमली पदार्थाचा व्यावहार गोव्यात वाढत असल्याचे मागच्या काही काळात दिसून आले आहे. यंदाच्या पर्यटक हंगामा काळात अमली पदार्थांच्या व्यवहारावर आळा आणून यात शामील असलेल्यांना गजाआड करण्यासाठी मुरगाव तालुक्यातील पोलीसांनी चौख रित्या नजर ठेवलेली आहे. रेल्वे मार्गाने अमली पदार्थ आणण्याचा प्रयत्न झाल्याचे यापूर्वी उघड झाल्याने रेल्वे स्थानकावर पोलिसांकडून सध्या कडक नजर ठेवली आहे. विमानतळ परिसरातही पोलिस सतर्क आहेत अशी माहीती पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली.

टॅग्स :Drugsअमली पदार्थPoliceपोलिसArrestअटकgoaगोवा