मुंबई : येस बँकेचा संस्थापक राणा कपूर याची जामिनावर सुटका करण्यास विशेष पीएमएलए न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. येस बँक घोटाळ्याप्रकरणाचा तपास संपला आहे. तसेच कागदी स्वरूपात असलेल्या पुराव्यांची छेडछाड करणे शक्य नाही. त्यामुळे त्याला कारागृहात ठेवण्याची आवश्यकता नाही, असे राणा याच्या वकिलांनी विशेष न्यायालयाला सांगितले.मात्र, विशेष न्यायाधीश पी.पी. राजवैद्य यांनी राणाचा जामीन अर्ज फेटाळला. पीएमएलएअंतर्गत राणा कपूर याला मार्चमध्ये अटक करण्यात आली होती. डीएचएफएलकडून राणा कपूर याच्या मुलीच्या कंपनीत ट्रान्सफर करण्यात आलेल्या ६०० कोटी रुपयांची चौकशी सक्तवसुली संचालनालय करत आहे. राणा कपूर, त्याची पत्नी व तीन मुली याप्रकरणी आरोपी आहेत. कर्जाची मोठी रक्कम मंजूर केल्याप्रकरणी कपूरला एकूण ४,३०० कोटी रुपयांची लाच मिळाली आहे. त्याचीही चौकशी ईडी आणि सीबीआय करत आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मेट्रो सिटीत IS ची कमान महिलांच्या हाती; NIAचा मोठा खुलासा
Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा
दहा रुपये, समोसा अन् घडली भयावह घटना; शाळकरी मुलाने गळफास लावून केली आत्महत्या
वेदनादायी! शेतात घुसली म्हणून सांडणीचे कुऱ्हाडीनं कापले पाय; तडफडत सोडला जीव
एल्गार परिषद : वरावरा राव यांच्या प्रकृतीचा अहवाल द्या
दुर्घटना टळली! पश्चिम रेल्वे मार्गावर एक्सप्रेस आणि ट्रकचा अपघात, जीवितहानी नाही