जम्मू-काश्मीरमधील एका कॉन्स्टेबलची आज पुलवामा जिल्ह्यातील गुडरू भागात त्याच्या राहत्या घरात घुसून दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. गेल्या २४ तासांत काश्मीरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांनी केलेली ही दुसरी हत्या आहे.पोलीस प्रवक्त्याने सांगितले की, जिल्ह्यातील गुडरु येथे आज सकाळी पोलीस कॉन्स्टेबल रियाझ अहमद ठोकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. जखमी पोलिसाला तातडीने शहरातील लष्कराच्या 92 बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु जखमी अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला. तसेच काल गुरुवारी, काश्मिरी पंडित आणि सरकारी कर्मचारी असलेल्या राहुल भट्ट यांची बडगाम जिल्ह्यातील चदूरा येथील कार्यालयात दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यामुळे काश्मीर परिसरात खळबळ माजली आहे. अनेकठिकाणी निदर्शनं करण्यात येत आहेत. जम्मू काश्मिरमधील बडगाम जिल्ह्यात गुरुवारी काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची हत्या करण्यात आली होती. त्यांच्या कार्यालयात घुसून दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. दरम्यान आज एका पोलीस कॉन्स्टेबलची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. त्यांच्याही घरात घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना शुक्रवारी सकाळी पुलवामा येथे भट्ट कुटुंबीयांना भेटण्यास परवानगी नाकारण्यात आली. मुफ्ती म्हणाल्या की, केंद्र सरकारच्या “त्यांच्या संरक्षणात अपयश”विरोधात निषेध करणार्या काश्मिरी पंडितांशी एकता व्यक्त करण्यासाठी मला बडगामला भेट द्यायची आहे. शुक्रवारी एका ट्विटमध्ये, मुफ्ती पुढे म्हणाले की, "काश्मिरी मुस्लिम आणि पंडित एकमेकांच्या वेदनांबद्दल सहानुभूती बाळगतात ही वस्तुस्थिती त्यांच्या दुष्ट सांप्रदायिक कथनात बसत नाही म्हणून तिला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे."
काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या पत्नीचा गंभीर आरोप, 'धोका असूनही सुरक्षा नाही मिळाली'माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पोलिसांच्या उच्च दर्जाच्या सुरक्षेला “लज्जास्पद” असे संबोधले आणि ते पुढे म्हणाले, “काश्मीरच्या लोकांसाठी हे नवीन नाही कारण जेव्हा सर्व प्रशासन हातोडा असते तेव्हा प्रत्येक समस्या खिळ्यासारखी असते. जर नायब राज्यपाल सरकार जर काशिमीरी पंडितांचे संरक्षण करू शकत नसेल तर त्यांना निषेध करण्याचा अधिकार आहे.”