शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

काल आत गेला अन् आज बाहेर, शक्तिप्रदर्शन करणाऱ्या गजा मारणेला जामीन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 9:53 PM

गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण होता कामा नये याकरिता पुणे पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत मारणेसह त्याच्या दोनशे साथीदारांविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १६) रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देगुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण होता कामा नये याकरिता पुणे पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत मारणेसह त्याच्या दोनशे साथीदारांविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १६) रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.

पुणे : तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर, कोथरूडमध्ये शक्तिप्रदर्शन केल्याप्रकरणी गुंड गजानन उर्फ गजा मारणे व त्याच्या साथीदारांचीन्यायालयाने प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर बुधवारी (दि.१७) जामिनावर मुक्तता केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. बाफना-भळगट यांनी हा आदेश दिला. गजा मारणेला न्यायालयात आणताना मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गजा मारणे आणि शरद मोहोळ या दोघांना दोन वेगवेगळ्या प्रकरणात एकाचवेळी न्यायालयात आणण्यात आल्याने पोलिसांमध्ये काहीसे तणावाचे वातावरण होते.

गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण होता कामा नये याकरिता पुणेपोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत मारणेसह त्याच्या दोनशे साथीदारांविरुद्ध कोथरुडपोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १६) रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. त्यापैकी मारणेसह ९ जणांना पोलिसांनी अटक केली, तर गुन्हा दाखल झालेल्यापैकी २७ जणांची नावे निष्पन्न झाली. यात गजा पंढरीनाथ मारणे (वय ४८), प्रदीप दत्तात्रय कंधारे (वय ३६), बापू श्रीमंत बागल (वय ३४), अनंता ज्ञानोबा कदम (वय ३७), गणेश नामदेव हुंडारे (३९), रुपेश कृष्णराव मारणे (वय ३८), सुनील नामदेव बनसोडे (वय ४०) श्रीकांत संभाजी पवार (वय ३४) आणि सचिन आप्पा ताकवले (वय ३२) यांना अटक करण्यात आली होती.

अमोल बधे आणि पप्पू गावडे या दोघांच्या खून प्रकरणात सबळ पुरावे नसल्याने न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केल्यानंतर, सोमवारी सायंकाळी मारणे याची मुंबईतील तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. या वेळी त्याच्या हजारो समर्थकांनी तळोजा कारागृहासमोरच मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करीत आरडाओरडा केला. फटाके फोडण्याबरोबरच ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरणही केले. चित्रीकरण करीतच पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरुन ४०० ते ५०० अलिशान गाड्यांमधून जंगी मिरवणूक काढत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कोथरुडमध्ये मंगळवारी (दि. १६) रात्री गजा मारणे व समर्थकांनी बेकायदेशीरपणे जमाव जमवून हमराज चौकातील गणपती मंदिरात विनापरवाना आरती केली. यावेळी जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.

गुन्ह्यातील दोनशे ते अडीचशे साथीदार आरोपींना अटक करून त्यांच्याकडे तपास करायचा आहे. गुन्ह्यात वापरलेल्या तीनशे गाड्या जप्त करायच्या आहेत. शक्तिप्रदर्शनासाठी कोणी आर्थिक सहाय्य केले याचा तपास करायचा आहे, यासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, असा युक्तिवाद सरकारी वकील संजय दीक्षित यांनी केला. आरोपींच्या वतीने ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने मारणे आणि त्याच्या साथीदारांना न्यायालयीन कोठडी दिली. त्यानंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. दरम्यान, मारणे व त्याच्या साथीदारांविरुद्ध तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात देखील याच प्रकारचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात देण्याची मागणी देखील पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केली होती. मात्र,न्यायालयाने ती फेटाळली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिसArrestअटक