शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

'तू मला अटक करु शकत नाही'; आसारामने धमकावल्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने काय केलं? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 9:46 AM

२०१३ मध्ये आसारामला अटक केलेल्या पोलीस पथकाचं नेतृत्व करणारे आयपीएस अधिकारी अजयपाल लांबा यांनी हे पुस्तक लिहिलं आहे.

ठळक मुद्देपुस्तकात आसारामला अटक करण्यासाठी पोलिसांची टीम पोहोचली त्या वेळेचा उल्लेखआसारामला अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर दबाव आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीने मुलीला शाळेत पाठवणंही बंद केले होते.

जयपूर – बलात्कार प्रकरणात दोषी असलेल्या आसाराम बापूच्या अटकेची घटना आता पुस्तकाच्या माध्यमातून बाजारात उपलब्ध होणार आहे. अटकेच्या वेळी पळापळ, पोलिसांनी मीडियाला चकमा देण्यासाठी बनवलेल्या कथा आणि आसाराम यांनी पोलिसांना दिलेली विधानं याचा पुस्तकात समावेश आहे. अटक करताना आसाराम बापूने पोलिसांवर दबाव टाकण्याचाही प्रयत्न केला होता असं पुस्तकातून समोर आलं आहे.

आसाराम बापू अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांना सांगतात की, तुमच्या मोबाइलवर एक कॉल येईल. तुम्ही मला अटक करू शकत नाही त्यानंतर, त्या पोलीस अधिकाऱ्याने आपल्या मोबाईलचं काय केले हेदेखील पुस्तकात सांगितलं आहे. २०१३ मध्ये आसारामला अटक केलेल्या पोलीस पथकाचा कार्यभार सांभाळणारे आयपीएस अधिकारी अजयपाल लांबा यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. त्याचं नाव  'Gunning for the Godman: The True Story Behind Asaram Bapu’s Conviction' असं आहे.

इंग्रजी वेबसाइट इंडियन एक्स्प्रेसने या पुस्तकाच्या रंजक गोष्टींचा रिपोर्ट प्रकाशित केला आहे. पुस्तकातील एका ठिकाणी आसाराम आणि पोलीस यांच्यातील संवादांचा उल्लेख अशा प्रकारे केला आहे, “बापू, तुम्ही काय केले ते मला सांगा असं पोलीस अधिकाऱ्यांनी ठणकावून विचारलं तेव्हा बापू म्हणाले, मी चूक केली, मी चूक केली असं ते म्हंटले. पुस्तकात आसारामला अटक करण्यासाठी पोलिसांची टीम पोहोचली त्या वेळेचा उल्लेख आहे. तेव्हा आसाराम पोलीस अधिकाऱ्याला म्हणाले तू हे करु शकत नाही. तुला वरुन आदेश येईल त्यानंतर तू मला अटक करू शकणार नाहीस. आसारामने पोलिसांवर आपला दबाव टाकण्याचा प्रयत्न केला त्याला उत्तर म्हणून अधिकाऱ्याने त्याच्या खिशातून मोबाईल काढून फोन बंद केला.

मुलीला शाळेत पाठवणंही बंद केले.

आसाराम बापूला ७ वर्षांपूर्वी अटक केली गेली होती. परंतु आयपीएस अधिकारी अजयपाल लांबा, ज्यांनी बलात्काराच्या दोषी आसारामला अटक केलेल्या पोलिस पथकाचे नेतृत्व केले होते. रिपोर्टनुसार अजयपाल लांबा म्हणतात की, त्यांना आसारामच्या समर्थकांकडून धमक्यांचे फोन येत होते. या धमक्यांना घाबरून त्याच्या पत्नीने एकदा आपल्या मुलीला शाळेत पाठविणे बंद केले होते. जेव्हा मी पुस्तक लिहितोय हे समजल्यानंतरही आसारामच्या समर्थकांनी धमक्या देणं सुरु केले असं जयपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अजयपाल लांबा यांनी सांगितले.

इतर बर्‍याच अधिकाऱ्यांनी कायदेशीर बाबींचा अभ्यास केला, काहीजण चौकशीत गुंतले, तर काहींनी सायबर कौशल्याच्या माध्यमातून हे प्रकरण समोर आणण्यास मदत केली. त्यावेळी अजयपाल लांबा जोधपूर पश्चिमचे डीसीपी होते, आसारामला अटक करण्यासाठी मी मीडियाचा पुरेपूर फायदा घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले की, पत्रकार परिषदेत त्यांनी मीडियाला धूम ठोकली की आसारामला अटक करण्यासाठी एक टीम पाठवण्यात आली आहे. तेवढ्यात ही पत्रकार परिषद पाहत असलेल्या त्यांच्या मित्राने सांगितले की, आसाराम भोपाळ विमानतळावर दिसले होते. लांबा यांनी ही माहिती माध्यमांना दिली.

...अन् आसाराम जाळ्यात अडकला

मला पाहिजे होते तसे घडले, त्यानंतर आसारामच्या सर्व हालचालींवर माध्यमांनी नजर ठेवण्यास सुरुवात केली, त्यानंतर मला त्यांच्यावर पाळत ठेवण्याची काहीच गरज नव्हती. तो माणूस घाबरून पळायला लागला आणि आम्ही टाकलेल्या जाळ्यात तो सहजपणे अडकला. समर्थकांचा तीव्र विरोध असूनही आसाराम अखेर इंदूरला पोहोचले जेथे त्याला अटक करण्यात आली असं अजयपाल लांबा म्हणतात.

एप्रिल २०१८ मध्ये जोधपूर विशेष कोर्टाने आसारामला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याबद्दल दोषी ठरवले. पोक्सो कायद्यानुसार कोर्टाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा (मृत्यूपर्यंत) आणि एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसAsaram Bapuआसाराम बापू