शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

'तुने माँ की कसम पुरी कर दी'; तरुणाच्या हत्येनंतर आरोपीच्या भावाची प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 12:30 PM

कुऱ्हाडीचे घाव घालून एकाचा शाहनूरमियाँ चौकात खून

ठळक मुद्देजुन्या वादातून एका हॉटेलमध्ये तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला उस्मानपुरा ठाण्यात चौघांवर खुनाचा गुन्हा 

औरंगाबाद : हॉटेलमध्ये चहा पीत बसलेल्या एका ३७ वर्षीय युवकाच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून खून केल्याची घटना बुधवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली. शेख सुभान शेख आमिर (३७, रा. शम्सनगर, शाहनूरवाडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. 

शाहनूरवाडीतील रमजानी टी हाऊसमध्ये शेख सुभान हे आपल्या मित्रासह चहा पीत बसले होते. रात्री १०.३० ते १०.४५ वाजेच्या दरम्यान आरोपी शेख नईम शेख सलीम (३५) हा शेख अलीम, शेख समीर या दोन्ही भावांसह गुपचूप तेथे आला व अचानक शेख सुभानच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घातले. या हल्ल्यात सुभान काही क्षणातच जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला वाचविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्यांच्या मागेही नईम कुऱ्हाड घेऊन लागला. त्यामुळे मित्रही तेथून जीव वाचवून पळून गेले. अखेर अब्दुल सत्तार व त्याच्या अन्य मित्राने जखमी सुभानला खाजगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. परिसरात खुनाची वार्ता पसरली आणि बघ्यांची गर्दी उसळली होती. उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप तारे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन आरोपी शेख नईम यास ताब्यात घेतले. 

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलेशेख सुभान याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून जीवे मारण्याची घटना परिसरातील खाजगी सीसीटीव्हीत कैद झाली असून, ते फुटेज पोलीस हस्तगत करीत आहेत. 

तुने माँ की कसम पुरी कर दीसुभानवर कुऱ्हाडीने हल्ला करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून आरोपी शेख नईमचा भाऊ म्हणाला, ‘आरे भाई चल, तुने माँ की कसम पुरी कर दी’, व ते घटनास्थळावरून पसार झाले. किरकोळ भांडणातून उद्भवलेल्या प्रकारात खून करण्याचा प्रकार समोर आला आहे. हे  दोन्ही कुटुंबे समोरासमोर राहतात. कुटुंबात होणाऱ्या किरकोळ भांडणावरून ऐकमेकांवर अदखलपात्र गुन्हेदेखील दाखल करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक तारे यांनी सांगितले. शेख शकील शेख आमिर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुभानच्या खूनप्रकरणी शेख नईम शेख सलीम, शेख अलीम, शेख सलीम  व त्याच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उस्मानपुरा पोलीस करीत आहेत. 

महिनाभरापूर्वी झाला होता वादमृत शेख सुभानला तीन मुली आणि दोन मुले आहेत. सुभान आणि शेख परिवार हे समोरासमोरच राहतात. महिनाभरापूर्वी लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून दोन्ही परिवारात जोरदार वाद झाला होता. हा वाद पोलिसांतही गेला होता; परंतु समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी मध्यस्थी करीत प्रकरण मिटवले होते. मात्र, शेख नईम ऊर्फ गोरू याच्या मनात शेख सुभान याच्यासोबत झालेल्या भांडणाचा राग होता. त्या रागातूनच ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादArrestअटक