कानपूर - घाटमपूरच्या बीबीपूर गावात वडील आणि मोठ्या मुलीने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ८ वर्षीय मुलगी दुर्गासमोरच मोठी बहीण मंजिता आणि वडील मनोज यांनी हे कृत्य केले. विष पिण्याआधी वडिलांनी छोट्या मुलीला तुला मरायचं नाही, तू आत्यासोबत राहा असं म्हटलं त्यानंतर दोघांनी विष प्यायलं. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
दुर्गाने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, वडिलांनी माझ्यासमोर जेवणात विष मिसळले, त्यानंतर वडील आणि मोठ्या बहिणीने ते जेवण खाल्लं. तू हे जेवण अजिबात खाऊ नको. तुला जिवंत राहायचं असं वडिलांनी आत्महत्या करण्यापूर्वी सांगितले. दुर्गाने जेव्हा वडिलांकडे जेवणाची मागणी केली तेव्हा वडील आणि मोठी बहीण दोघेही एका खोलीत गेले आणि त्यांनी आतून दरवाजा बंद केला. काही वेळात या दोघांची प्रकृती ढासळली.
चुलत भाऊ विनोदने सांगितले की, मंगळवारी दोन्ही मुलींसह काका दीड वर्षांनी गावाला आले होते. घरातील साफसफाई केल्यानंतर रात्री ही घटना घडली. या घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांनी कच्च्या घरातून २ ग्लास, मिठ आणि उंदिर मारायचं औषधाची २ पाकिटे फॉरेन्सिक लॅबला पाठवली. प्राथमिक तपासात मनोजने मोठी मुलगी मंजिताला आधी जेवण देऊन त्यानंतर स्वत: विष प्यायले. मनोजची मानसिक स्थिती ठीक नव्हती. या प्रकरणाचा तपास सुरू आहे असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुलीला विष पाजून स्वत: केली आत्महत्या बीबीपूर गावात बुधवारी वडिलांनी मुलीला आधी विष पाजून स्वत: आत्महत्या केली या घटनेने गावात खळबळ माजली. घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाला. मनोज कुमार हा मुंबईत राहायचा. त्याच्यासोबत मंजिता आणि दुर्गा या दोन मुलीही होत्या. मंगळवारी हे तिघे गावी आले होते. मनोजची पत्नी आणि मुलींची आई सविता ५ वर्षापूर्वी भांडण करून तिच्या माहेरी गेली होती. पत्नी पुन्हा येत नसल्याने मनोज खूप त्रस्त होता.
पत्नीचा विरह सहन होत नसल्याने तो मुलींना घेऊन मुंबईत कमाईसाठी आला. त्यानंतर मुंबईतून मंगळवारी तो गावी परतला आणि त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. त्यामुळे मनोजने मुलीला मारून स्वत: आत्महत्या का केली या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.