मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात एका चार वर्षांच्या मुलाची अनुकंपा तत्त्वावर बालरक्षक किंवा बाल हवालदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुलाला 18 वर्षे वयापर्यंत हवालदाराच्या निम्मा पगार मिळेल. मध्य प्रदेशात बालरक्षक नेमण्याची तरतूद आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली.एजन्सीनुसार, कटनीचे पोलिस अधीक्षक (एसपी) सुनील जैन यांनी सांगितले की, गजेंद्र मरकम यांची या आठवड्यात चाइल्ड कॉन्स्टेबल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. गजेंद्रचे वडील श्याम सिंग मरकाम हेड कॉन्स्टेबल होते. त्यांची नियुक्ती मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथे झाली होती. मुलाने वडील गमावले होते. या संदर्भात मुलाची पोलीस विभागात अनुकंपा तत्वावर नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे कटनीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनोज केडिया यांनी सांगितले की, कटनीमध्ये बालरक्षकाची सहा ते आठ पदे आहेत. नियमांनुसार, गजेंद्रला 18 वर्षांचे होईपर्यंत आणि शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत नियमित पोलिसाच्या निम्मा पगार मिळेल.पोलिसांची कार्यशैली समजून घेण्यासाठी कार्यालयात यावे लागतेकेडिया पुढे म्हणाले की, गजेंद्र अभ्यासासोबतच पोलिसांचे कामकाज समजून घेण्यासाठी एक-दोनदा कार्यालयात येणार आहे. ते म्हणाले की, जबलपूर झोनच्या पोलिस महानिरीक्षकांनी नरसिंगपूरमध्ये एकही जागा रिक्त नसल्याने गजेंद्रला येथे बालरक्षक म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव कटनी पोलिसांना पाठवला होता. मध्य प्रदेश पोलिसांमध्ये अनुकंपा तत्त्वावर बालरक्षकाची नियुक्ती करण्याची तरतूद आहे.
थक्क व्हाल! ४ वर्षाचा मुलगा झाला हवालदार, १८ वर्षांचा होईपर्यंत मिळणार इतका पगार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 9:09 PM