पंजाबमधील मोहाली भागातील मटोर येथे ७ ऑगस्टला भरदिवसा एका अज्ञात कारमध्ये आलेल्या चार हल्लेखोरांनी युवा अकाली दलाचे नेता विक्रमजीत सिंह मिड्दुखेड़ा उर्फ विक्की मिड्दुखेड़ा यांची गोळी घालून हत्या केली होती. या हत्येचा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.
या हत्येचा अनेकांकडून निषेध केला जात आहे. विक्की सकाळी प्रॉपर्टी डीलरकडे आले होते. येथे आधीत हल्ला करण्याच्या तयारीत असलेले हल्लेखोर दबा धरून बसले होते. दरम्यान,विक्की बाहेर येताना दिसला, त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला.
विक्की हे अकाली दलाचे नेते अजय मिड्दुखेड़ा यांचे लहान भाऊ आहे. अजय मिड्दुखेड़ा यांनी नुकताच माजी महापौर कुलवंत यांच्या मुलाविरोधात पालिका निवडणूक लढवली होती. विक्की यांचे २ वर्षांपूर्वी लग्न झाले होते.