आरा - आरा - बिहारमधील आरा येथे दानापूर रेल्वे लाईनच्या बनाही स्टेशनपासून पश्चिम डाऊन लाइनवर शनिवारी रात्रीच्या सुमारास रेल्वे समोर एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यानंतर मोठी धावपळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच, आरा रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठविला. समित चौबे (चुलबुल चौबे) (वय 22) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो बक्सर जिल्ह्यातील ब्रह्मपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौबे चक गावचा रहिवासी होता.
संबंधित तरुणाने आत्महत्येपूर्वी आपल्या आईसाठी 2 मिनिट 53 सेकंदांचा एक व्हिडिओही तयार केला असून तो सेशल मीडियावर पोस्ट केला आहे.
‘डॉक्टर जिंकला मी हरलो’ -व्हिडिओमध्ये तरुणाने म्हटले आहे, "आई, आज मी आत्महत्या करत आहे. यामागे कुठल्याही मुलीचा हात नाही. मुलीसंदर्भात कसल्याही प्रकारचे रहस्य नाही. आत्महत्येचे कारण एक डॉक्टर आहे, ज्याने मला प्रचंड त्रास दिला आहे. डॉक्टरकडे पैसा आहे, शक्ती आहे. माझ्याकडे काहीही नाही, यामुळे आज डॉक्टर जिंकला आणि मी हरलो. "
हा तरुण पुढे भोजपुरी भाषेत बोलला आहे. त्याचा अर्थ साधारणपणे असा, “मी आधीपासूनच नालायक राहिलो, आजही आहे. तुझा लायक मुलगा फार छोटा आहे. त्याला सध्या शिकवा. त्याला मोठं करा. त्याच्यावर कामासाठी दबाव टाकू नका. कारण कामाचे प्रेशर फार मोठे प्रेशर असते. जेव्हा मुलगा घराबाहेर पडतो, तेव्हापासूनच सर्वांचे प्रेशर घेऊन चालावे लागते.
आज तुझ्याकडे 100 रुपये मांगीतले. तर तू दिले. पण... -तुरुणाने पुढे म्हटले आहे, “आज तुझ्याकडे 100 रुपये मांगीतले. तर तू दिले. पण, एवढं रागवत दिले, की माझी कुवत काय आहे, हे मी ओळखले. आई ठीक आहे, सध्या मी बिहियां स्टेशनवर आहे. आपल्याला 100 रुपये देताना समजत नाहीये. डॉक्टर जे म्हणत आहे, खरे आहे. पण मी जे बोलत आहे, ते चूक आहे.” एवढे बोलून या तरुणाने रडत-रडतच आत्महत्या केली. मात्र, या व्हिडिओत युवकाला डॉक्टरसंदर्भात काय सांगायचे आहे, ते स्पष्ट झालेले नाही.