विवाहित प्रेयसीसोबत चुंबन घेताना युवकानं व्हिडीओ पोस्ट केला अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2021 05:33 PM2021-11-23T17:33:12+5:302021-11-23T17:34:25+5:30
Ujjain kissing a couple who ran away from home : दोघांना पकडून महाकाल पोलीस ठाण्यात नेण्यात आले. महाकाल पोलीस ठाण्यात दोघांची चौकशी केली असता एक विचित्र किस्सा समोर आला.
उज्जैन : पवित्र शिप्रा नदीत स्नान करण्यासाठी देशभरातून भाविक उज्जैनमध्ये येतात. या शिप्रा नदीत भोपाळच्या एका जोडप्यावर अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. रामघाटावर कर्तव्यावर असलेले सुनील पंथी यांनी सांगितले की, रामघाटावर एक महिला व तरुण अश्लील कृत्य करत असल्याची माहिती काही लोकांमार्फत मिळाली होती. त्यानंतर दोन पोलिसांनी घटनास्थळी जाऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी काही जुमानले नाही. यानंतर दोघांना पकडून महाकाल पोलीस ठाण्यात नेण्यात आले. महाकाल पोलीस ठाण्यात दोघांची चौकशी केली असता एक विचित्र किस्सा समोर आला.
दोन मुलांच्या आईसह भोपाळहून पळून तरुण उज्जैनला आला होता
ब्रज असे या तरुणाचे नाव आहे. तो मूळचा भोपाळचा असून दोन मुलांच्या आईसह भोपाळहून पळून तो उज्जैनला आला होता. यादरम्यान तिने इन्स्टाग्रामवर फिल्मी गाण्यांसह एक अश्लील व्हिडिओ पोस्ट केला. दोघींना अश्लील कृत्य करताना पाहून हळुहळू घटनास्थळी लोकांची गर्दी जमू लागली. मात्र, पोलिसांनी त्यांना पकडले.
जोडप्याला भोपाळ पोलिसांच्या ताब्यात दिले
सुरुवातीला ब्रजने तरुणीला पत्नी असल्याचे सांगितले, मात्र पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केल्यावर त्याच्या तोंडून सत्य बाहेर आले. त्याने विवाहितेला घरातून पळवून आणल्याचे सांगितले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या दोघांनीही हा अश्लील व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना पोस्ट केला होता. हा व्हिडिओ महिलेच्या पतीपर्यंतही पोहोचला होता. दोघेही प्रौढ असल्याने पोलीस कोणतीही औपचारिक कारवाई करू शकले नसले तरी भोपाळमध्ये दोघांवर बेपत्ता झाल्याची नोंद असल्याने त्यांना भोपाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला
ब्रजने महिलेसोबत चुंबन घेतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. ते दोघेही राम घाटावर रासलीला करत आहेत, कोणाची हिंमत असेल तर त्यांना पकडून दाखवा, असेही त्यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे. हे आव्हान ब्रज नावाच्या तरुणाने महिलेचा पती आणि इतर नातेवाइकांना दिले होते. मात्र, उज्जैन पोलिसांनी हे आव्हान स्वीकारून दोघांनाही ताब्यात घेतले.