इंदूर : शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंदूरमध्ये छत्तीसगडमधील तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने तरुणीला जवळपास महिनाभर एका फार्म हाऊसमध्ये बंधक बनवून ठेवले आणि तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही तर तिचे गुप्तांग आणि शरीराचे इतर भाग दाताने चावून सिगारेटने चटके दिले. ही बाब उघडकीस आल्यापासून शहरात खळबळ उडाली आहे.महिनाभर सामूहिक बलात्कार
हे आरोप पीडितेनेच केले आहेत. पीडितेने दोनदा जीव वाचवून पळ काढला आहे. एकदा ती छत्तीसगडला परत गेली होती. पीडितेचा आरोप आहे की, छत्तीसगडमध्येही आरोपीने आपले लोक पाठवले, तिला धमकावले आणि परत बोलावले. पीडितेला पुन्हा इंदूरला येण्यास भाग पाडले. हा अत्याचार सहन होत नसल्याचे मुलीने सांगितले आणि शेवटी एक दिवस संधी पाहून फार्म हाऊसमधून पळ काढला आणि थेट शिप्रा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तिचे पूर्ण म्हणणे ऐकून घेत गुन्हा दाखल केला. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलीस तपासात दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.ऑनलाईन झाली होती ओळख
मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी मूळची बीजाघाट, बेमेतरा छत्तीसगड येथील रहिवासी आहे. मुलीचे वय 32 वर्षे आहे. शनिवारी त्यांनी शिप्रा पोलीस ठाणे गाठून आपली तक्रार दाखल केली. मेट्रोमोनियल वेबसाईटवर राजेशची विश्वकर्मासोबत तिची ओळख झाल्याचे सांगण्यात आले. यानंतर दोघांचे चॅटिंग सुरू झाले आणि राजेशने तिच्याशी लग्न करण्याचे वचन देऊन तिला आपल्यासोबत इंदूरला आणले. येथे आपल्या फार्म हाऊसवर ठेवले आणि लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करत राहिले. तरुणीच्या म्हणण्यानुसार, त्याचे मित्र अंकेश बघेल, विवेक विश्वकर्मा आणि विपिन भदौरिया हे देखील फार्म हाऊसवर जायचे. या सर्व नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला. सुमारे दीड महिना त्यांना फार्म हाऊसमध्ये ओलीस ठेवले होते.
'मी घाबरलो आणि पोलिसांशी खोटे बोललो, अल्वर बलात्कार पीडितेला घेऊन जाणारा रिक्षाचालकाने दिलीदोन आरोपी फरारबलात्कारादरम्यान आरोपीने सिगारेटने तिचा गुप्तांगाला चटके देण्यात आले आणि दाताने चावल्याचा आरोप आहे. एकदा खूपच दुखापत झाली, म्हणून त्यावर उपचारही घेण्यात आले. त्यानंतर फार्म हाऊसचा मालक राजेश याने त्याच्या साथीदारासह तिला छत्तीसगड येथील तिच्या घरी पाठवले आणि कोणालाही काहीही न सांगण्याची धमकी दिली. नंतर तिला परत आणले. शनिवारी रात्री मुलीने इंदूर गाठून संपूर्ण प्रकरणाची तक्रार केली, त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला पकडले. अजून दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.
आधीच विवाहित, फसवणूक झालेल्या मुलीशी दुसरे लग्नइंदूर पोलिसांच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ही महिला छत्तीसगडची रहिवासी आहे. ती सरकारी शिक्षक आहेत. मॅट्रिमोनिअल साइटवरून आरोपी ची महिलेशी ओळख झाली. त्यानंतर दोघांनी लग्न केले. एका मुलाखतीत पीडित महिलेने म्हटले आहे की, लग्न समारंभात पतीच्या घरातून कोणीही आले नव्हते. लग्नासाठी तो एकटाच आला होता. आरोपी आधीच विवाहित होता.दोन वर्षांत पतीने मित्रांसोबत अनेकवेळा सामूहिक बलात्कार केलापोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, 32 वर्षीय महिलेने आरोप केला आहे की, नोव्हेंबर 2019 ते ऑक्टोबर 2021 दरम्यान तिचा पती आणि त्याच्या साथीदारांनी तिच्यावर क्षिप्रा पोलीस स्टेशन हद्दीतील एका फार्म हाऊसमध्ये अनेकदा सामूहिक बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्य केले.