शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

"तुझ्या कष्टामुळे चांगले फळ मिळाले..."; एक कोटीची लाच घेणाऱ्या दोघांचे संभाषण उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 9:55 AM

या लाचखोरीत फरार असलेला तत्कालीन उपअभियंता गणेश वाघ याचाही सहभाग निष्पन्न झाला आहे. 

नाशिक : एका शासकीय ठेकेदाराकडून त्याने केलेल्या कामाच्या मोबदल्यात देयकांची रक्कम मंजूर करून देण्यासाठी तब्बल एक कोटी रुपयांची लाच मागणारा व घेणारा सहायक अभियंता अमित किशोर गायकवाड व तत्कालीन उपअभियंता गणेश वाघ यांच्यामधील मोबाइलवरील संभाषण अत्यंत धक्कादायक असून, वाघ याने गायकवाड याच्यासोबत बोलताना ‘तुझ्या कष्टामुळे हे चांगले फळ मिळाले...’ असे शेवटी वाक्य वापरल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासातून समोर आली आहे.

एक कोटी रुपयांची लाच घेताना अहमदनगर येथील राज्य औद्योगिक विकास महामंडळाचा सहायक अभियंता अमित गायकवाड (३२, रा. आनंदविहार, नागापूर, जि. अहमदनगर) याला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतले. या लाचखोरीत फरार असलेला तत्कालीन उपअभियंता गणेश वाघ याचाही सहभाग निष्पन्न झाला आहे. 

पडताळणी करून पकडले रंगेहाथ तक्रारीवरून नाशिक परिक्षेत्राच्या पथकाने २० ऑक्टोबरला पडताळणी केली. यावेळी अमित गायकवाडने तक्रारदाराकडून स्वत:साठी व संशयित गणेश वाघ याच्यासाठी एक कोटी रुपयांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केले होते. वाघ आणि गायकवाड यांच्या संभाषणात तर चक्क ‘तुझ्या कष्टाचे हे फळ मिळाले आहे’, असेही वाक्य समोर आले आहे, असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलिस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांनी नाशिकमध्ये सांगितले. धुळे येथे कार्यकारी अभियंता असलेला वाघ आणि गायकवाड या दोघांविरुद्ध अहमदनगरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुदत संपली, तरी मागील बिले काढण्याचा प्रकारमुळा धरण ते एमआयडीसी या जलवाहिनीचे जुने पाइप बदलण्याचे हे काम तीन वर्षांपासून सुरू होते. या कामाची मुदत संपली होती. विळद घाट येथील काम शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी अडविलेले आहे. हे काम अपूर्ण असताना ठेकेदाराला मागच्या तारखेने बिल मंजूर करण्यासाठी व काम अपूर्ण असताना त्याची अनामत रक्कम परत देण्यासाठी गायकवाड याने ठेकेदाराकडे १ कोटी मागितले होते. 

चांगले पुरावे हाती! नाशिकच्या पथकाने अत्यंत नियोजनबद्ध अशी सापळा कारवाई केली आहे. अहमदनगरच्या या कारवाईत चांगले पुरावे हाती लागले आहेत. यामुळे ही केस उत्तमरीत्या उभी राहण्यास मदत होईल. फरार संशयितदेखील लवकरच हाती लागेल. या दोघांची अहमदनगर व पुण्यातील घरेदेखील पथकांकडून ‘सील’ करण्यात आली आहेत. या प्रकरणी वेगवान तपास केला जाईल, असे विश्वास नांगरे-पाटील म्हणाले. 

लाचेच्या रकमेत वाटेकरी किती?गायकवाड हा सहायक अभियंता आहे. त्याच्यावर कार्यकारी अभियंता व मुख्य अभियंता अशी पदरचना आहे. कार्यकारी अभियंता व मुख्य अभियंता हे दोघेही पुणे कार्यालयात असतात, तर नगर कार्यालयातील तत्कालीन उपअभियंता वाघ हा धुळे येथे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहे. गायकवाड याने स्विकारलेल्या १ कोटीतील निम्मी रक्कम वाघ याला देण्यात येणार होती, तसेच जुने बिल मागील तारखेने दिले जाणार असल्याने, लाचेच्या रकमेत आणखी इतर किती वाटेकरी होते, याचा शोध पोलिस घेत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकBribe Caseलाच प्रकरण