विवेक भुसे ।लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : फायनान्सचा व्यवसाय असलेला व्यावसायिक मुंबईला जात असताना अचानक त्यांचा मोबाईल बंद पडला़ नेटवर्कचा प्रॉब्लेम सुरू असल्यामुळे आपला मोबाईल बंद पडला असावा, असे त्यांना वाटले़ दुसऱ्या दिवशी उशिरा ते पुण्यात आले़ त्यानंतर तिसºया दिवशी त्यांनी मोबाईल कंपनीच्या कस्टमर केअरला जाऊन प्रॉब्लेम सांगितल्यावर त्यांना तुमच्या नावाने दुसरे सिमकार्ड इश्यू झाल्याने पहिले बंद करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले़ तेव्हा त्यांनी दुसरे सिम बंद करून पुन्हा जुने सिम सुरू करायला सांगितले़ त्यांनी कार्यालयात जाऊन पाहिले असता त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ५० लाख रुपये वेगवेगळ्या २८ बँक खात्यांत ट्रान्स्फर करण्यात आल्याचे आढळून आले़
अनेकदा आपल्याला मोबाईल कंपन्यांकडून ई-मेल, मोबाईलवर नोटिफिशेन आलेले असते; पण आपण ते नोटिफिकेशन नेमके काय आहे, हेही पाहत नाही़ पाहिले तरी त्याकडे दुर्लक्ष करतो़ त्यातूनच व्यावसायिकांची सायबर चोरटे अशा प्रकारे फसवणूक करीत असल्याचे वारंवार दिसून आले आहे़
सिम स्वाईप फ्रॉड करताना सर्वप्रथम तुमचा ई-मेल हॅक केला जातो़ त्यातून तुमच्या मोबाईल कंपनीला जुने सिमकार्ड खराब झाले आहे, मोबाईल गहाळ झाला आहे, यांपासून वेगवेगळी कारणे सांगून ते बंद करायला सांगितले जाऊन नवीन सिम कार्ड मिळविले जाते़ खरं तर इथे सिमधारकाचा काही रोल येत नाही़ मोबाईल कंपनीने व्हेरिफिकेशन करून मगच नवीन सिमकार्ड इश्यू करणे आवश्यक असते़ अशा वेळी आम्ही सिमकार्डधारकाला ई-मेल, मेसेज करून सिमकार्ड बदलण्याचा अर्ज केला आहे का, असा ई-मेल पाठविला असल्याचे सांगून नामानिराळे होतो.
यामध्ये तुमच्याकडील असलेले सिमकार्ड बंद करून दुसरे सिमकार्ड सुरू केले जाते़ तुमच्या अकाऊंटवर तुमचे सर्व ई-मेल, सोशल मीडिया व बँक खाते लिंक असल्याने सायबर चोरट्यांना ते आपोआप प्राप्त होते़ त्यावरून त्यांनी बँकेचे व्यवहार केले तरी त्याचा ओटीपी त्यांच्याकडील सिमकार्डवर येत असतो़ तुमचे सिमकार्ड बंद पडलेले असल्याने तुमच्या खात्यातून लूट केली जात असल्याचे तुम्हाला समजतही नाही़काय काळजी घ्याल?जुने सिमकार्ड नष्ट करावेअनेकदा नवीन सिमकार्ड घेतल्यावर जुने सिमकार्ड कोठेही टाकून दिले जाते़ ते जर दुसºयाच्या हाती लागले तर त्यातून तुमची फसवणूक होऊ शकते़ त्यासाठी जुने कार्ड वापरात नसेल तर त्याचा नंबर बंद करायला सांगून त्यावरील सर्व लिंक काढून टाकाव्यात व तो अपडेट केला पाहिजे़४नंबर बदलल्यानंतर जुना नंबर वापरात नसेल तर तीन महिन्यांनी कंपनीकडून तो रिसायकल केला जातो़ या तीन महिन्यांच्या काळात त्या सिमकार्डवरून काही गोष्टी घडल्या तर त्याचा तो नंबर आहे, त्याच्या नावाने त्या गोष्टी घडलेल्या असतात़ त्यामुळे तुम्ही वापरत नसलेला नंबर कंपनीला सांगून बंद केला पाहिजे़