नवीन पनवेल : टास्कसाठी सात लाख १९ हजार २२८ रुपये घेऊन मिळणाऱ्या कमिशनची रक्कम न देता फसवणूक केल्याप्रकरणी अनोळखी १६ इसमांविरोधात तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
विशाल वसंत पवार हे फेज टू, तळोजा येथे राहत असून त्यांना टेलिग्राम अकाउंटवरून लिंक आली व नोकरी करायची असेल तर त्यावर क्लिक करा असे सांगितले. त्यांनी लिंक क्लिक केले. यावेळी तीन टास्क करायचे आहेत असे सांगण्यात आले. पहिल्या टास्कसाठी १५ हजार भरण्यास सांगितले. त्यांनी ते पैसे भरले व टास्क पूर्ण केला.
दुसऱ्या टास्कसाठी ५० हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यांनी ते पैसे पाठवून टास्क पूर्ण केले. त्यानंतर दीड लाख रुपये भरण्यास सांगितले. त्यांनी ते पैसे भरून टास्क पूर्ण केला. त्यानंतर पुढच्या टास्कसाठी तीन लाख रुपये भरण्यास सांगितले असता त्यांनी ते पैसे भरून टास्क पूर्ण केला.
पोलिसांत गुन्हा दाखलसर्व टास्क पूर्ण झाल्यानंतर भरलेली रक्कम पाच लाख पंधरा हजार रुपये होत होती. त्याचे नऊ लाख वीस हजार रुपये मिळणार, असे त्यांना टेलिग्राम चॅटिंगवर सांगण्यात आले. त्यांच्या अकाउंटला नऊ लाख वीस हजार रुपये आले नाहीत. यावेळी विचारले असता रकमेवर दोन लाख ७६ हजार रुपयांचा टॅक्स भरावा लागेल आणि टॅक्स भरल्यावर ११ लाख ९६ हजार रुपये भेटतील असे सांगितले.
यावेळी समोरील व्यक्ती फसवणूक करत असल्याचे दिसून आले. त्यांनी टॅक्सचे पैसे भरले नाही.त्यानंतर ते टेलिग्रामवर टास्क खेळत होते. त्यांना दोन लाख चार हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यांनी ते पैसे भरून तीन टास्क पूर्ण केले. यावेळी शेवटचा टास्क करावा लागेल त्यासाठी चार लाख ६८ हजार भरावे लागतील, असे सांगितले. पैसे नसल्याने त्यांनी रक्कम भरली नाही. टेलिग्राम मेसेजद्वारे तुमची रक्कम मिळणार नाही, असे सांगण्यात आले. त्यामुळे सर्व खातेधारक व साईट या बनावट आहेत.