नवी दिल्ली:दिल्लीतील कापसडेडा परिसरातील एका फार्म हाउसच्या मालकाने चोरीच्या संशयात एका तरुणाला लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण करत अंगावर कुत्रे सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत जखमी तरुणाचा मृत्यू झाला आहे.
दक्षिण-पश्चिम दिल्लीचे डीसीपी इंगित प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय संदीप महतो आपल्या वडिलांसोबत समालखामध्ये राहत होता. त्याचे वडील ड्रायव्हर आहेत. बुधवारी सकाळी 10 वाजता तो आपल्या मित्रांसह कापसहेडामधील फार्म हाउसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी फार्म हाउसच्या सिक्योरिटी गार्ड आणि मालकाने त्याला पकडले. त्याला मारहाण सुरू करताच त्याच्या मित्रांनी पळ काढला. संदिपला चोरीच्या संशयात लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण करण्यात आली.
जखमी अवस्थेत आपला जीव वाचवण्यासाठी संदिपने पळ काढला असता, त्याच्यावर आरोपी मालकाने कुत्रे सोडले. त्या कुत्र्यांनी अतिशय वाईट पद्धतीने संदिपच्या शरीरावर जखमा दिल्या. इतकं सर्व होऊनही मालकाला दया आली नाही. त्याने संदिपला रुगणालयात नेण्याऐवजी तसचं रस्त्यावर पडू दिले.
दिवसभर रस्त्यावर पडून होता संदिपसकाळी 10 वाजल्या पासून सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत संदिप तशाच जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होता. 4.30 वाजता रस्त्याने जाणाऱ्या एका व्यक्तीचे त्याच्याकडे लक्ष्य गेले आणि त्याने पोलिसांना याची सूचना दिली. पोलिसांनी संदिपला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी फार्म हाउसचा मालक प्रकती संधू आणि सिक्योरिटी गार्ड बिनोद आणि त्याला मुलगा रोहितला अटक केली आहे.