उत्तर प्रदेशमधील बस्ती जिल्ह्यातील हरैय्या पोलिस स्टेशन परिसरातील कसैला गावात पहाटे पाच वाजेच्या सुमारास शिव नावाचा एक तरुण 33 हजार केव्हीच्या विद्युत खांबावर चढला. हे पाहून गोंधळ उडाला आणि शेकडो गावकरी जमा झाले. त्यांनी त्या युवकाला खाली येण्यास विनंती करण्यास सुरवात केली. सुमारे तीन तास चाललेल्या हाय-व्होल्टेज नाटकानंतर, त्याला खाली उतरवण्यास यश आले. या युवकाला समज दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.कुटुंबियांशी वाद झाल्याने चढला विद्युत खांबावर
गावकऱ्यांनी सांगितले की, शिव बहाल उर्फ सहलु हा नशा करणारा माणूस आहे आणि तो दररोज कुटूंबाच्या सदस्यांशी भांडण करतो. ज्यामुळे घरात दररोज कलह निर्माण होतो. बुधवारी सुद्धा दिवसभरात कोणत्याही ना कोणत्या गोष्टीवरून वाद झाला होता, यामुळे तो तरुण संतापला आणि विजेच्या 33 हजार केव्ही खांबावर चढला. त्याची वेळ चांगली होती म्हणून त्यावेळी वायरमधील विद्युत प्रवाह नव्हता.बर्याच प्रयत्नांनंतर यश मिळाले
पोलिस आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नातून यश मिळाले आणि तो तरुण खाली उतरला. तब्बल ३ तास चाललेले तरूणाचे हायव्होल्टेज नाटक संपले. व्यसनाधीन व्यक्ती असलेल्या तरूणाला पोलिसांनी आपल्याबरोबर पोलिस ठाण्यात नेले. त्याला समज दिल्यानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी विजेच्या खांबाला विद्युत प्रवाह होत नसल्यामुळे नशेत असलेल्या तरूणाचा जीव वाचला. अन्यथा ज्या प्रकारे तो खांबावर चढला आणि वायर पकडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता हे त्याच्या जीवावर बेतलं असते. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी विजेच्या खांबाला विद्युत पुरवठा होत नसल्यामुळे नशेत असलेल्या तरूणाचा जीव वाचला. अन्यथा ज्या प्रकारे तो खांबावर चढला आणि वायर पकडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता हे त्याच्या जीवावर बेतलं असते.