नवी दिल्ली - देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता उत्तर प्रदेशमध्ये समोर आली आहे. रेल्वे रुळावर रक्ताच्या थारोळ्यात एका तरुण पडलेला काही लोकांना दिसला. त्याने आत्महत्या केली असून त्याच्याजवळ एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. ही नोट वाचून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाने आपल्या नोटमध्ये पत्नीसाठी एक भावूक करणारा संदेश दिला आहे. "मी जीवन संपवतोय पण माझ्या बाळाला नक्की जन्म दे, आपल्या प्रेमाचं ते प्रतीक आहे" असं म्हटलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील एका रेल्वे स्टेशनजवळील भागात ही घटना घडली. एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. त्यावेळी पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली होती. ज्य़ामध्ये त्या तरुणाने आपला मृत्यू होण्यापूर्वी काही संदेश लिहिला होता. हा तरुण हिंदू असून एका मुस्लिम मुलीच्या प्रेमात पडल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. दोघांनी गुपचूप लग्नही केलं होतं. या नात्याला समाज आणि कुटुंबामध्ये मान्यता नव्हती, यामुळे त्या तरूणानं हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे.
भूपेंद्र यादव असं या तरुणाचं नाव आहे. "मी आत्महत्या करायला जात आहे. माझं मृत शरीर माझ्या घरी माझ्या पत्नीकडे पोहचवा. माझ्या पत्नीचं नाव मरियम बानो आहे. मरियम आय लव्ह यू. तू माझी चिंता करू नकोस, मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. माझ्या बाळाला नक्की जन्म दे, आपल्या प्रेमाचं ते प्रतीक आहे. मी आता मरत आहे. पण तुझ्या मनात मात्र कायम राहणार आहे. माझ्यासोबत नेमकं काय झालं?, मी का मेलो? हे सर्व माझी पत्नी मरियम तुम्हाला सांगेल. माझी शेवटीची इच्छा आहे की माझ्यावर अंत्यसंस्कार माझी पत्नी मरियम करेल. दुसरं कोणीही करू नये. तसेच माझी विनंती आहे, माझ्या मरणानंतर मरियम पुन्हा दुसरं लग्न करू नकोस" असं या तरुणाने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
भयंकर! लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून जोरदार राडा; मंडपातच पडला रक्ताचा सडा अन्...
हैदराबादमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. लग्नपत्रिकेत नाव न छापण्यावरून जोरदार राडा झालेला पाहायला मिळाला. तसेच मंडपातच रक्ताचा सडा पडला. नाव न छापण्यावरून सुरू झालेला वाद शेवटी टोकाला गेला आणि एकमेकांवर चाकूने वार करण्यात आले. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले आहेत. तुकारामगेट परिसरातल्या आझाद चंद्रशेखर नगरमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारे शेखर (24) आणि सर्वेश (20) या दोघा आरोपींनी हे कृत्य केलं. 16 जून रोजी त्यांच्या एका नातेवाईकाचं लग्न होतं. लग्नाच्या आमंत्रणपत्रिकेत सर्व मंडळींची नावं होती. मात्र शेखर आणि सर्वेश यांच्या आई-वडिलांची नावं त्यात नव्हती. त्याचा राग शेखर आणि सर्वेश यांच्या मनात होता. त्यावरून त्यांचं आणि यादगिरी नावाच्या त्यांच्या एका नातेवाईकाचं भांडण झालं. या दोघा आरोपींनी यादगिरीच्या पत्नीमुळे आपल्या आई-वडिलांची नावं छापली गेली नसल्याचा आरोप केला आणि वाद झाला.