"मुख्यमंत्रीजी, बेरोजगार असल्याने मी आत्महत्या करतोय; तरुणांना रोजगार द्या"; Video जोरदार व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 08:43 AM2021-07-18T08:43:39+5:302021-07-18T08:51:56+5:30

Youth committed suicide after not getting job in the army :

youth committed suicide after not getting job in the army | "मुख्यमंत्रीजी, बेरोजगार असल्याने मी आत्महत्या करतोय; तरुणांना रोजगार द्या"; Video जोरदार व्हायरल

"मुख्यमंत्रीजी, बेरोजगार असल्याने मी आत्महत्या करतोय; तरुणांना रोजगार द्या"; Video जोरदार व्हायरल

googlenewsNext

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. याच दरम्यान मध्य प्रदेशमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. सैन्यात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण न झाल्याने एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. गळफास घेऊन आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. या तरुणाने या संदर्भात मुख्यमंत्र्यांना देखील एक पत्र पाठवलं आहे. तसेच आत्महत्येपूर्वी त्याने एक व्हिडीओ तयार केला होता. जो आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने "मुख्यमंत्रीजी, माझी तुम्हाला विनंती आहे की, विद्यार्थ्यांना रोजगार द्या. बेरोजगारीमुळे मी आज आत्महत्या करत आहे" असं म्हणत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

बेरोजगार तरुणाच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील शेहदखेडी येथे राहणाऱ्या कुंदन राजपूतने 10 जुलै रोजी इंदूरच्या पीथमपूरमध्ये आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वीचा कुंदनचा व्हिडीओ आणि सुसाईड नोट आता समोर आली असून ती जोरदार व्हायरल होत आहे. कुंदन गेल्या दोन वर्षांपासून सैन्यामध्ये भरती (army recruitment ) होण्याची तयारी करीत होता. यासाठी कुंदनने गेली दोन वर्षे उज्जैनमध्ये राहून कोचिंगमध्ये तयारी केली. मात्र कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सैन्याची भरती निघाली नाही. यामुळे तो तणावात होता. 

सैन्यात भरती होण्याचं त्याचं स्वप्न होतं. त्यासाठी तो गेल्या कित्येक वर्षांपासून मेहनत करत होता. मात्र भरती होत नसल्याने तो अत्यंत तणावात होता. 5 जुलै रोजी तो इंदूरच्या पीथमपूर येथील एका कंपनीत नोकरी करण्यासाठी गेला होता. 5 दिवस काम केल्यानंतर 10 जुलै रोजी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. "मुख्यमंत्रीजी, तुम्हाला विनंती आहे की, लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करा. बेरोजदारांना रोजगार द्या. आज मी गळफास घेऊन आत्महत्या करीत आहे. दोन वर्षांपासून सैन्यातील भरतीदेखील झालेली नाही, शिवाय माझं वयही उलटून गेलं आहे" असं कुंदनने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. 

"मी गेल्या तीन वर्षांपासून उज्जैनमध्ये सैन्य भरतीची तयारी करीत होतो. माझं वय वाढल्यामुळे मी आता भरतीची परीक्षाही देऊ शकत नाही. माझ्यासारखे अनेक विद्यार्थी तणावात आहेत. त्यांनी असं पाऊल उचलू नये यासाठी तुम्ही प्रयत्न करा. मी आज त्याच विद्यार्थ्यांसाठी गळफास घेत आहे. माझी विनंती आहे की, माझ्या मृत्यूनंतर माझं पोस्टमार्टम करू नये. माझे कुटुंबीय आणि मुख्यमंत्र्यांना माझं पत्र द्यावे. पोलिसांनाही माझी विनंती आहे की त्यांनी मला माझ्या घरापर्यंत पोहोचवावं" असं देखील कुंदनने आपल्या नोटमध्ये म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: youth committed suicide after not getting job in the army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.