शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

आसाराम आश्रमातून युवक गायब; मुलाच्या शोधात आई-वडील फिरताहेत दारोदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 18:42 IST

Youth Missing :हैदराबादहून आश्रमात आलेला तरुण बेपत्ता झाला आहे. त्याचे आई-वडील त्याच्या शोधात भटकत आहेत. आश्रमाने या तरुणाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. तरुणाच्या कुटुंबीयांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

लैंगिक शोषण प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूचा आश्रम पुन्हा एकदा वादात सापडला आहे. हैदराबादहून अहमदाबादच्या साबरमती भागातीलआश्रमात आलेला तरुण बेपत्ता झाला आहे. त्याचे आई-वडील त्याच्या शोधात भटकत आहेत. आश्रमाने या तरुणाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. तरुणाच्या कुटुंबीयांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.

आसाराम बापूचा भक्त २७ वर्षीय राहुल (नाव बदलले आहे) ३ नोव्हेंबर रोजी आपल्या मित्रांसह साबरमती परिसरातील आसाराम आश्रमात आला होता. मित्र परत आले होते, पण राहुल इथेच थांबला. बराच वेळ तो घरी न परतल्याने त्याचे पालक त्याच्या शोधात अहमदाबादला पोहोचले आणि त्यामुळे तो बेपत्ता झाल्याचे उघड झाले.

2008 मध्ये दोन मुलांचे मृतदेह सापडले होते

2008 मध्ये दीपेश आणि अभिषेक नावाचे दोन भाऊही या आश्रमातून बेपत्ता झाले होते. काही दिवसांनी दोघांचेही मृतदेह सापडले. दोन्ही भाऊ आश्रमातील गुरुकुलातच शिक्षण घेत होते. त्यावेळचे पोलीस आयुक्त डीके त्रिवेदी यांच्या अहवालाच्या आधारे सरकारने या आरोपांच्या चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, मुलांच्या मृत्यूचे रहस्य उलगडले नाही. 

 

आसाराम बापू जोधपूर तुरुंगात

उत्तर प्रदेशात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूला जोधपूर पोलिसांनी अटक केली होती. अल्पवयीन मुलीचे आई-वडील आसाराम भक्त होते. जोधपूरच्या मध्यवर्ती कारागृहात असलेल्या आसाराम बापूवर जातीचा छळ, खून, धमकी देऊन जमीन बळकावण्याचे आरोपही आहेत.

टॅग्स :Missingबेपत्ता होणंahmedabadअहमदाबादAsaram Bapuआसाराम बापूDeathमृत्यू